सामंत वालावलकर आणि कंपनी

  • Home
  • सामंत वालावलकर आणि कंपनी

सामंत वालावलकर आणि कंपनी Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from सामंत वालावलकर आणि कंपनी, Health Food Shop, .

सामान्य माणसाचा असामान्य मेवा..  🖌अ.र.वालावलकर हे बघा, आर. के. लक्ष्मणांचा तो कॉमन मॅन म्हणजे बिचारा जन्मापासूनच कॉम्प्र...
06/02/2026

सामान्य माणसाचा असामान्य मेवा.. 🖌अ.र.वालावलकर

हे बघा, आर. के. लक्ष्मणांचा तो कॉमन मॅन म्हणजे बिचारा जन्मापासूनच कॉम्प्रमाईजच्या खांद्यावर बसून प्रवास करणारा माणूस. जो जन्मभर फक्त रांगेत उभा राहिला, पण ज्याच्या वाट्याला कधीच पहिली नंबरची खुर्ची आली नाही. तोच आमचा हा कोट-धोतरधारी माणूस , तो जेव्हा कोकणात येतो आणि समोर काजूची पाकिटं बघतो, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर जे भाव उमटतात.. ते फक्त त्यालाच त्याच्या नजरेच्या आरशात दिसतात...

हे बघा, आर. के. लक्ष्मणांचा तो कॉमन मॅन म्हणजे बिचारा जन्मापासूनच कॉम्प्रमाईजच्या खांद्यावर बसून प्रवास करणारा म.....

सामान्य माणसाचा असामान्य मेवा..  🖌अ.र.वालावलकर
06/02/2026

सामान्य माणसाचा असामान्य मेवा.. 🖌अ.र.वालावलकर

हे बघा, आर. के. लक्ष्मणांचा तो कॉमन मॅन म्हणजे बिचारा जन्मापासूनच कॉम्प्रमाईजच्या खांद्यावर बसून प्रवास करणारा म.....

काजूचा डब्बा : एक थरारनाट्य – 🖌अ.र.वालावलकरमध्यमवर्गीय घरात काजूचा डब्बा ही वस्तू कपाटातील लॉकरपेक्षाही जास्त सुरक्षित ठ...
30/01/2026

काजूचा डब्बा : एक थरारनाट्य – 🖌अ.र.वालावलकर

मध्यमवर्गीय घरात काजूचा डब्बा ही वस्तू कपाटातील लॉकरपेक्षाही जास्त सुरक्षित ठिकाणी ठेवलेली असते. हा डब्बा म्हणजे केवळ सुकामेवा नसून, तो घरातील प्रतिष्ठेचा आणि संयमाचा अंतिम कस असतो. डब्बा उघडण्याची पूर्वतयारी काजूचा डब्बा उघडणे ही काही चहासाठी साखर काढण्याइतकी सोपी गोष्ट नाही. यासाठी घरात आधी शांतता लागते. डब्याचे टोपण उघडताना होणारा तो टक्क असा आवाज शेजारच्यांना किंवा घरातल्या मुलांना ऐकू गेला, की समजा तुमच्या आनंदावर विरजण पडलं.....

मध्यमवर्गीय घरात काजूचा डब्बा ही वस्तू कपाटातील लॉकरपेक्षाही जास्त सुरक्षित ठिकाणी ठेवलेली असते. हा डब्बा म्हण.....

आफ्रिकन काजू म्हणजे लग्नातला तो रिमोट कंट्रोल सारखा वागणारा लांबचा पाहुणा, जो दिसायला अगदी टिपटॉप असतो पण त्याला कोणाशीच...
28/01/2026

आफ्रिकन काजू म्हणजे लग्नातला तो रिमोट कंट्रोल सारखा वागणारा लांबचा पाहुणा, जो दिसायला अगदी टिपटॉप असतो पण त्याला कोणाशीच काही देणं घेणं नसतं.

आणि कोकणातला काजू? हा म्हणजे आमचा बाळू मामा, शर्टाची बटणं उघडी, अंगाला मातीचा गंध, पण एकदा का मिठी मारली की जगातलं सगळं सुख त्या एका स्पर्शात, आफ्रिकन काजूने फक्त दात घासले जातात खालल्यावर, कोकणातल्या गावठी काजूने काळजाला पाझर फुटतो..

आयुष्य हे आफ्रिकन काजूंसारखं एकसारखं नसावं, तर कोकणी काजूंसारखं वेडंवाकडं पण रसाळ असावं..

हे ऐकून तुमच्या ओळखीच्या एखाद्या आफ्रिकन काजू छाप नातेवाईकाचा चेहरा डोळ्यांसमोर आला? असेल तर हा निव्वळ योगायोग आहे.

अ.र.वालावलकर

अहो, आफ्रिकन काजू आणि आपला कोकणी काजू यातला फरक म्हणजे इमिटेशन ज्वेलरी आणि अस्सल पुतळ्यांची माळ यातला फरक आहे..तो आफ्रिक...
27/01/2026

अहो, आफ्रिकन काजू आणि आपला कोकणी काजू यातला फरक म्हणजे इमिटेशन ज्वेलरी आणि अस्सल पुतळ्यांची माळ यातला फरक आहे..तो आफ्रिकेचा पाहुणा दिसायला कदाचित धष्टपुष्ट असेलही, पण चवीच्या बाबतीत तो म्हणजे 'एसी'त बसलेला सुटाबुटातला साहेब, ज्याला मातीतल्या ओलाव्याची काय किंमत? जर आपणच आपल्या काजूचं कौतुक केलं नाही, तर उद्या तो आफ्रिकन काजू कोकण कन्या ट्रेनमधून प्रवास करून स्वतःला मालवणी म्हणवून घेईल,तेव्हा सावध व्हा, आणि अभिमानाने म्हणा
“काजू आमचा, चव आमची आणि GI टॅगवर हक्कही आमचाच”

जसे दोन काजूचे तुकडे एक समान कधीच आकाराचे नसतात तसेच रोज वेगळ्या शब्दातील वेगळे रूप लोचनी पाहवयास मिळेल.

अ.र.वालावलकर

*सामंत वालावलकर आणि कंपनीचे काजूचे वाण ---*                आमच्या कोकणात कसं असतं, संक्रांतीला वाण काय द्यायचं यावर गृहि...
13/01/2026

*सामंत वालावलकर आणि कंपनीचे काजूचे वाण ---*

आमच्या कोकणात कसं असतं, संक्रांतीला वाण काय द्यायचं यावर गृहिणींच्या संसदेत तासनतास चर्चा रंगतात, अहो आमदार खासदारांची जरी झोप पूर्ण झाली तरी मातृशक्तींच्या वाण चर्चा काही संपेना...स्टीलचे डबे, प्लास्टिकच्या बरण्या आणि काचेच्या वाट्यांच्या गर्दीत बिचारी संक्रांत हरवून जाते.
पण मंडळी, अस्सल कोकणी चवीचा वारसा सांगणाऱ्या सामंत वालावलकर आणि कंपनीचे काजू जर तुम्ही वाण म्हणून दिलेत, तर ती सवाशीण तुमच्या नावाने वर्षभर साखर खाईल,,, अहो, त्या प्लॅस्टिकच्या डब्याचं आणि त्याच्या आकाराचे काय कौतुक? त्यापेक्षा सामंत वालावलकर आणि कंपनी यांच्याच बागेतील हा तुकतुकीत काजू म्हणजे जणू निसर्गाचं सर्वोत्तम डिझाईन..

सवाष्णींच्या वाणाची रीत,आणि सामंत वालावलकर आणि कंपनीचा काजू वाण पाहून शेजारणीच्या मनातही जगलेली प्रीत.. ह्यातच आमचा नफा.
वाण असावं असं की घेणाऱ्यानेही म्हणावं वा बुवा
*”काय थाट आहे...“* आमच्या कोकणातल्या काजूच्या एका तुकड्यात अख्ख्या कोकणची नागमोडी वाट आहे.

मंडळी, वाण द्यायला उशीर झाला तर चालेल, पण आमचे काजू संपायला उशीर लागणार नाही, तेव्हा वेळीच आपली ऑर्डर नोंदवा, नाहीतर हळदीकुंकवाला आलेली ती फुलराणी काजू संपल्यावर रुसून बसायची, बरं का.

ऑर्डर करण्यासाठी 🙏
सामंत वालावलकर आणि कंपनी
8591994272

माधव गाडगीळ: सह्याद्रीचा वेडा ऋषी.. कैवल्यप्राप्ती – अ.र.वालावलकर 🖌सह्याद्रीच्या कणाकणाशी ज्यांचं नातं जडलं, त्या ऋषीतुल...
08/01/2026

माधव गाडगीळ: सह्याद्रीचा वेडा ऋषी.. कैवल्यप्राप्ती – अ.र.वालावलकर 🖌

सह्याद्रीच्या कणाकणाशी ज्यांचं नातं जडलं, त्या ऋषीतुल्य माणसाच्या शब्दांची किंमत आम्हाला त्यांच्या हयातीत कळू नये, हीच आमच्या सुसंस्कृतपणाची सर्वात मोठी शोकांतिका आहे, डोंगराएवढा माणूस समोर असताना आम्ही डंपरच्या ढिगाऱ्यात आमचं भविष्य शोधत राहिलो, हेच आमचं दुर्दैव आणि आज शेवटी ते डोंगर कोसळलं, ज्येष्ठ पर्यावरण शास्त्रज्ञ् माधवराव गाडगीळ काळाच्या आड हरपले.. ज्या अहवालाची आपण धूळ खात रवानगी केली, त्यासोबत आपण गाडगीळ नावाच्या विचारालाही जिवंतपणीच मारून टाकलं होतं, इतकी आपली कोकणातल्या लोकांची मनस्थिती आणि परिस्थिती विदारक आहे....

सह्याद्रीच्या कणाकणाशी ज्यांचं नातं जडलं, त्या ऋषीतुल्य माणसाच्या शब्दांची किंमत आम्हाला त्यांच्या हयातीत कळू ...

सामंत वालावलकर आणि कंपनी: सातासमुद्रापार कोकण जपणारी हक्काची चव!आमचा कोकणचा माणूस म्हणजे समुद्राच्या लाटेसारखा जगाच्या क...
06/01/2026

सामंत वालावलकर आणि कंपनी: सातासमुद्रापार कोकण जपणारी हक्काची चव!

आमचा कोकणचा माणूस म्हणजे समुद्राच्या लाटेसारखा जगाच्या कोणत्याही किनाऱ्यावर फेकला गेला, तरी ओढ मात्र त्या लाल मातीचीच“ ...
मग तो लंडनमध्ये असो वा लायबेरियात, साहेबाशी 'येस सर' म्हणतानाही त्याच्या डोळ्यासमोर देवगडचा हापूस आणि वालावलकरांचा काजूच नाचत असतो.

“सामंत वालावलकर आणि कंपनी” हे केवळ दुकान नसून, परदेशातल्या कोकणी माणसासाठी विठ्ठलाचं मंदिरच आहे; जिथल्या काजूच्या एका फोडीत उभ्या कोकणाचं दर्शन घडतं. वालावलकरांचे मसाले डब्यातून बाहेर आले की सातासमुद्रापारच्या घरांतही भजन सुरू व्हावं तसा दरवळ सुटतो. शेवटी काय, माणूस म्हातारा होतो पण त्याची जीभ आणि कोकण कधीच म्हातारं होत नाही. वालावलकरांच्या काजूचा एक तुकडा तोंडात टाकला की, न्यूयॉर्कच्या फ्लॅटमध्येही आंजर्लेच्या किनाऱ्यावरची वाळू पायाला लागल्याचा भास होतो, हेच त्यांचं खरं पुण्य

अ.र.वालावलकर

Address


416602

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when सामंत वालावलकर आणि कंपनी posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

  • Want your business to be the top-listed Grocery Store?

Share