आजोबा - काळजी माझी आणि माझ्या कुटुंबाची

  • Home
  • India
  • Mumbai
  • आजोबा - काळजी माझी आणि माझ्या कुटुंबाची

आजोबा - काळजी माझी आणि माझ्या कुटुंबाची The Treasure Trove of Authentic Kokani Products: Naturally Made, Guaranteed Quality. Honey, Ghee, Jaggery,

What Makes Us Different? Contact Us Today!

नैसर्गिकरित्या तयार केलेली, कोकणातील अस्सल गावठी आणि दर्जेदार उत्पादनासाठी खात्रीशीर नाव. सर्व प्रकारची पिठे, सर्व प्रकारचे मसाले, सरबते, मध, तूप, गूळ आणि इतर कोकणी मेवा उपलब्ध. अधिक माहितीसाठी खालील व्हॉटसअप बटणावर क्लिक करून आमच्याशी संपर्क साधा. Who We Are :
We are Kokani Authentic Products, dedicated to bringing you the experience of traditional and high-quality food items from the Konkan regi

on. With generations-old recipes and naturally sourced ingredients, we bring the unique flavors of Kokan to your table. What We Offer :
Flours, Spices, Kokani spices, Refreshing beverages like mango juice, kokum sharbat, and other fresh fruit sharbats. Natural: All our products are naturally made and free from any artificial colors, flavors, or preservatives. Local: We source our ingredients directly from Konkan, ensuring fresh and high-quality products. Variety: We offer a diverse range of Kokani products that help you experience this rich culinary culture. We're excited to share the joy of Kokani food with you!

पावसाळ्यातील आहारात पालेभाज्यांचा समावेश असावा का नसावा, याबद्दल अनेक लोकांमध्ये संभ्रम असतो. पालेभाज्यांमध्ये विविध पोष...
07/07/2024

पावसाळ्यातील आहारात पालेभाज्यांचा समावेश असावा का नसावा, याबद्दल अनेक लोकांमध्ये संभ्रम असतो. पालेभाज्यांमध्ये विविध पोषक तत्त्वे असतात, परंतु पावसाळ्यात त्यांच्या सेवनाचे काही धोकेही असतात. चला, पालेभाज्या पावसाळ्यात खाण्यास चांगल्या का वाईट यावर सविस्तर चर्चा करू.

पावसाळ्यात पालेभाज्या खाण्यास चांगले की वाईट? | Are Leafy Vegetables Good or Bad to Eat During Monsoon? | Health tips पावसाळ्यातील आहारात पालेभाज्यांचा सम.....

03/07/2024
मालवणी चिकन, माशाचे कालवण, काळ्या वाटण्याची उसळ, ओल्या काजूची भाजी असे अस्सल कोकणी पदार्थ पाहिले तरी अनेकांच्या तोंडाला ...
17/06/2024

मालवणी चिकन, माशाचे कालवण, काळ्या वाटण्याची उसळ, ओल्या काजूची भाजी असे अस्सल कोकणी पदार्थ पाहिले तरी अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं… मात्र हे पदार्थ चविष्ट होतात ते त्यामध्ये मिसळलेल्या स्पेशल मालवणी मसाल्यामुळे… कोकणात विशेषतः रत्नागिरी, मालवण, सिंधुदुर्ग या भागात जो साठवणीचा मसाला तयार केला जातो त्याला मालवणी मसाला असं म्हणतात. हा मसाला बनवण्याची एक खास पद्धत आणि प्रमाण आहे. साहित्याचे प्रमाण आणि योग्य पद्धत वापरली तर हा मसाला म्हणजे जादुगारच. हा मसाला एक ते दीड वर्ष टिकतो. शिवाय या मसाल्यामुळे स्वयंपाकाला अप्रतिम जव येते. नॉन व्हेज खाद्यपदार्थांची लज्जत या मसाल्यामुळे अधिकच वाढते. या मसाल्याच्या लोकप्रियतेमुळे हा मसाला अनेक घरात नेहमी वापरला जातो. अनेक जण घरी बनवण्याचा प्रयत्न करतात पण प्रत्येकालाच जमतो असे नाही. त्यासाठीच आम्ही देतो अस्सल घरगुती चवीचा स्पेशल मालवणी मसाला.

मालवणी मसाल्याबाबत अनेक जणांच्या मनात असलेल काही निवडक प्रश्न :

1. मालवणी मसाला किती दिवस टिकू शकतो ?
मालवणी मसाला हा साठवणीचा मसाला आहे. शिवाय तो कोरड्या जिन्नसांपासून केला जातो. उन्हात वाढवलेल्या मिरच्या आणि इतर गरम मसाल्यापासून तयार केलेला हा मसाला जवळजवळ एक वर्षभर चांगला टिकतो. यासाठीच अनेक घरांमध्ये वर्षभराचा स्पेशल मालवणी मसाला साठवला जातो.

2. मालवणी मसाल्यापासून कोणकोणते पदार्थ तयार करता येतात ?
मालवणी मसाल्यापासून रत्नागिरी, सिंधुर्दुर्ग विभागातील अस्सल मालवणी पदार्थ बनवता येतात. विेशेष म्हणजे सर्वच व्हेज आणि नॉनव्हेज मालवणी पदार्थांमध्ये हा स्पेशल मालवणी मसाला वापरला जातो.

3. मालवणी मसाला खूप तिखट असतो का ?
मालवणी मसाला हा थोडा झणझणीतच असतो. कारण त्यामुळे चिकन, मासे अशा नॉनव्हेज पदार्थांना खमंगपणा आणि स्वाद येतो. मात्र यातील लाल तिखट मिरचीचे प्रमाण कमी करून तुम्ही तो कमी तिखट करू शकता. शिवाय मसाला कमी तिखट करण्यासाठी त्यात धण्याचं प्रमाण वाढवावं ज्यामुळे त्याचा तिखटपणा कमी होतो. याचप्रमाणे स्वयंपाकात मसाल्याचा वापर थोडा कमी केल्यासही पदार्थांचा तिखटपणा कमी करता येऊ शकतो. मात्र अस्सल झणझणीत मालवणी पदार्थ खायचे असतील तर स्पेशल मालवणी मसाला वापरायलाच हवाच.

असाच स्पेशल मालवणी मसाला हवा असेल तर आजच ऑर्डर करा.
https://wa.me/c/919136616012

आमच्याकडे अस्सल कांडप वर कुटलेले दर्जेदार मसाले मिळण्याचे एकमेव ठिकाण
आजोबा - काळजी माझी आणि माझ्या कुटुंबाची

#मसाले #मसाला #आजोबा

14/06/2024

कोकणातील खजिना, थेट तुमच्या घरात !!
निसर्गाचा अनमोल ठेवा घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी

🍁 कोकण म्हणजे स्वर्ग🍁
आपण नेहमीच हे ऐकत आलोय, वाचत आलोय. याच स्वर्गीय पावन भूमीतील खाद्यसंस्कृती ही तेवढीच दर्जेदार आहे.
🍀 शरीरासाठी पौष्टिक आणि चवीसाठी लज्जतदार तेवढीच पारंपारिक आणि अस्सल घरगुती
😋 याच खाद्यसंस्कृतीची मेजवानी घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी.
1. सर्व प्रकारची पिठे
2. सर्व प्रकारचे कोकणातील मसाले
3. आवळा सरबत आणि आवळा ज्यूस
4. कैरी पन्हे
5. हापूस आमरस
6. कोकम सरबत, कोकम आगळ, आमसुलं
7. जांभूळ ज्यूस
8. सांडगी मिरची, ताक मिरची
9. नैसर्गिक शुद्ध मध
10. आयुर्वेदिक गूळ
11. हापूस आंबा जॅम / मिक्स फ्रूट जॅम
🍏 सर्व नैसर्गिक उत्पादने आपल्या कोकणाच्या मातीतील ,अस्सल चवीची आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कोणत्याही रासायनिक खताचा वापर न केलेली अशी एक नाही अनेक दर्जेदार उत्पादने.

अधिक माहितीसाठी संपर्क करा.

#आजोबा

 #तोच_स्वाद_तीच_चव आणि  #तोच_जिव्हाळा.5000 लाइक आणि 5100 follwers बद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद.आजोबा - काळजी माझी आणि...
09/06/2024

#तोच_स्वाद_तीच_चव आणि #तोच_जिव्हाळा.
5000 लाइक आणि 5100 follwers बद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद.

आजोबा - काळजी माझी आणि माझ्या कुटुंबाची

#आजोबा #गुळ

१० वी च्या परीक्षेत पास झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन व त्यांच्या पालकांचे सुद्धा अभिनंदन. सर्व पास विद्...
27/05/2024

१० वी च्या परीक्षेत पास झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन व त्यांच्या पालकांचे सुद्धा अभिनंदन. सर्व पास विद्यार्थ्याना पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा.

#आजोबा

🥭 हापूस आंबा जॅम :*🍒 मिक्स फ्रूट जॅम :*अस्सल नॅचरल जॅम.----------------------------------------------------------------आ...
21/05/2024

🥭 हापूस आंबा जॅम :*🍒 मिक्स फ्रूट जॅम :*
अस्सल नॅचरल जॅम.
----------------------------------------------------------------
आजोबा - काळजी माझी आणि माझ्या कुटुंबाची

ऑर्डर करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा.
https://api.whatsapp.com/send?phone=919136616012&text=Hello
----------------------------------------------------------------

#कोकण #आंबा #जांभूळ

🍒 कोकम :कोकण आणि कोकम एक अतूट नात आहे. फार कमी लोकांना माहित आहे की कोकम आरोग्यासाठी भरपूर फायदेशीर आहे. कोकमामुळे तुमची...
19/05/2024

🍒 कोकम :
कोकण आणि कोकम एक अतूट नात आहे. फार कमी लोकांना माहित आहे की कोकम आरोग्यासाठी भरपूर फायदेशीर आहे. कोकमामुळे तुमची रोग प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. ह्रदयासाठी उत्तम, मधुमेह नियंत्रणात राहतो म्हणूनच आम्ही घेऊन आलो आहोत उत्तम प्रतीची कोकमापासून तयार केलेली उत्पादने.

1. कोकम सोल किंवा आमसुलं :
कोकम हे एक पाचक फळ असून त्यामुळे पचनशक्ती सुधारण्यास मदत होते. त्याचप्रमाणे अपचन, मूळव्याधी, जुलाब, अंगाचा दाह अशा अनेक त्रासांमध्ये कोकम खाण्याचे फायदे होतात. कोकमाचे फळ सोलून ते मिठाच्या पाण्यात बुडवून कडक उन्हात वाळवले जाते. या खारवलेल्या सालीला आमसूल असं म्हणतात. आजोबा मध्ये असलेली आमसुले तीन फुटाची आहेत. आमसुलाचे सार, चटणी केली जाते. भाजी आमटीतही त्यांचा वापर केला जातो. आमसुले दोन दोन वर्षे चांगली टिकतात.

2. कोकम आगळ :
कोकमाची साल मिठाच्या पाण्यात सुकवताना त्यातून तो रस निघतो तो आगळ म्हणून वापरतात. कोकम आगळची सोलकढी बनवली जाते. रोजच्या जेवणात चवीसाठी आगळ उत्तम. एक ते दीड वर्ष हे आगळ सहज टिकते.

3. कोकम सरबत(अमृत कोकम) :
शरीरातील उष्णता वाढल्यामुळे अनेकांना पित्ताचा त्रास जाणवतो. मात्र जर तुमच्या अंगावर पित्ताचे चट्टे, पुरळ उठत असेल आणि त्यामुळे शरीराचा दाह होत असेल तर कोकम तुमच्यासाठी नक्कीच उपयुक्त आहे. कोकमाचं सरबत पिण्यामुळे तुमची पित्ताची समस्या कमी होऊ शकते. कोकम सरबत पित्तशामक आहे.

ज्या लोकांची प्रतिकार शक्ती कमी आहे अशा लोकांनी कोकम सरबत नियमित पिणे गरजेचं आहे.

- कोकम आमसुलं : 250 ग्रॅम : 90/-
- कोकम आगळ : 500 ml : 80/-
- कोकम सरबत : 500 ml : 110/-

ऑर्डर करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा.
https://api.whatsapp.com/send?phone=919136616012&text=Hello
----------------------------------------------------------------
आजोबा - काळजी माझी आणि माझ्या कुटुंबाची
#कोकण #आंबा #जांभूळ

🍇 जांभूळ ज्यूस आरोग्याचा खजिना आहे जांभळाचा रस. नियमित जर याचे सेवन केले तर शरीराला भरपूर फायदे होतात. आमच्या जांभूळ ज्य...
18/05/2024

🍇 जांभूळ ज्यूस
आरोग्याचा खजिना आहे जांभळाचा रस. नियमित जर याचे सेवन केले तर शरीराला भरपूर फायदे होतात. आमच्या जांभूळ ज्यूस मध्ये इतर कोणतेही घटक टाकले नाही आहेत. अगदी natural ज्यूस आहे. यांचे फायदे अनेक आहेत.

मधुमेह नियंत्रित करते :
या फळांच्या बियांमध्ये जांबोलिन आणि जॅम्बोसिन नावाचे पदार्थ असतात जे रक्तात साखरेच्या प्रवेशाची प्रक्रिया कमी करण्यास मदत करतात.

हृदयाचे आरोग्य चांगले राहते :
जांभूळामध्ये मोठ्या प्रमाणात पोटॅशियम असते. हृदयाच्या आजारांना दूर ठेवण्यासाठी हे फायदेशीर आहे. अनेक संशोधन अभ्यासातून असे दिसून आले आहे की जांभूळाचे सतत सेवन केल्याने रक्तवाहिन्या कडक होण्यास प्रतिबंध होतो आणि उच्च रक्तदाब टाळता येतो.

वजन कमी करण्यास मदत होते :
जांभूळामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते आणि कॅलरीज कमी असतात जे तुम्ही वजन कमी करण्याच्या आहाराचे पालन करत असाल तर ते उपयुक्त आहे. यातून मर्यादित कॅलरीज मिळते आणि सतत अन्न सेवन करण्याची इच्छा नष्ट करते ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

- जांभूळ ज्यूस : 500 ml : 200/-

ऑर्डर करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा.
https://api.whatsapp.com/send?phone=919136616012&text=Hello
----------------------------------------------------------------
आजोबा - काळजी माझी आणि माझ्या कुटुंबाची

#कोकण #आंबा #जांभूळ

🥭 हापूस आमरस :*- १००% नैसर्गिकरित्या बनवलेला आमरस. - उत्तम प्रतीचा हापूस आमरस.दर्जेदार हापुस आंब्या पासून बनवलेला आमरसवर...
16/05/2024

🥭 हापूस आमरस :*
- १००% नैसर्गिकरित्या बनवलेला आमरस.
- उत्तम प्रतीचा हापूस आमरस.
दर्जेदार हापुस आंब्या पासून बनवलेला आमरस

वर्षातून एकदाच मिळणाऱ्या ह्या हापूस आंब्याची चव वर्षभर तुमच्या जिभेवर रेंगाळणार.

आंबा म्हणजे फळांचा राजा. चव तर भन्नाट असतेच, शिवाय त्यामुळे शरीराला ऊर्जाही मिळते. आंबा स्वादिष्ट तसेच अनेक गुणधर्मांनी समृद्ध सुद्धा आहे. जर तुम्ही उन्हाळ्याच्या हंगामात आंब्याचा रस प्यायला तर तो तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतो.

500 ग्रॅम पॅकिंग मध्ये उपलब्ध.
किमंत 230/-

ऑर्डर करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा.
https://api.whatsapp.com/send?phone=919136616012&text=Hello
----------------------------------------------------------------
आजोबा - काळजी माझी आणि माझ्या कुटुंबाची

#कोकण #आंबा

आवळा हा बहुगुणी आहे. आपण पूर्वीपासून असे ऐकूत आलो आहोत की ... Apple A Day keeps Doctor Away. पण सत्यपरीस्थिती पाहता आणि ...
10/05/2024

आवळा हा बहुगुणी आहे. आपण पूर्वीपासून असे ऐकूत आलो आहोत की ... Apple A Day keeps Doctor Away. पण सत्यपरीस्थिती पाहता आणि खरेच निरोगी राहायचे असल्यास , डॉक्टर/वैद्य टाळायचे असल्यास सफरचंदापेक्षासुद्धा आपल्याला रोज एक आवळा ( मोरावळा ) सेवन लाभदायक आहे. आवळा हा आरोग्याच्यादृष्टीने " फळांचा राजा " आहे.

आवळा आपण नुसता, मीठाबरोबर , सरबत/ रस किंवा मोरावळा किंवा मोरावळा कॅंडी याप्रकारे ही खावू शकता. प्रत्येक आजार व होणाऱ्या फायदाविषयी लिहण्यापेक्षा, आवळ्यामध्ये " क " जीवनसत्वाचे प्रमाण सर्वाधिक असल्यामुळे तुमची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते व रोग होवू नयेत व लवकर
रोगमुक्त होण्यासाठी आपल्याला याचा नक्की फायदा आहे.

खराब जीवनशैली आणि बाहेरील खाण्यामुळे बहुतेक लोकांना लठ्ठपणाचा सामना करावा लागतो आहे. मात्र, आवळा लठ्ठपणा कमी करण्यास मदत करतो. आवळ्याचा रस दररोज पिल्याने आपले वजन झटपट कमी होण्यास मदत होते.
चयापचय कमकुवत होणे हे पोटाशी संबंधित समस्या, बद्धकोष्ठता, अपचन आणि इतर कारणे असू शकतात. चयापचय वाढवण्यासाठी आवळा ज्यूसचा रस प्या.
आवळ्यामध्ये असलेले गुणधर्म चयापचय सुधारण्याचे काम करतात.

याशिवाय आपल्या शरीरासाठी आवश्यक मानले जाणारे पोषक घटक जसे की लोह, कॅल्शियम आणि फायबर देखील त्यात असतात. बद्धकोष्ठता, अतिसार, अपचन यांसारख्या पोटाशी संबंधित समस्या आवळ्यामध्ये असलेल्या गुणधर्मांमुळे दूर होतात.

वजन कमी करण्यासाठी कोमट पाण्यामध्ये दोन चमचे आवळ्याचा रस मिक्स करा आणि प्या. यामुळे आपले वजन झपाट्याने कमी होईल. विशेष करून पोटावरील चरबी कमी करण्यास आवळा मदत करतो.

आजच ऑर्डर करा..
अतिशय गुणकारी असे आवळा सरबत, आवळा ज्यूस.
उत्तम आणि दर्जेदार, natural ज्यूस

मग आता वाट कसली पहाताय.. आजच ऑर्डर करा.
https://wa.me/919136616012

#आवळा #कोकण #कैरीपन्हे #कोकणी #आजोबा

Address

Mumbai

Alerts

Be the first to know and let us send you an email when आजोबा - काळजी माझी आणि माझ्या कुटुंबाची posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to आजोबा - काळजी माझी आणि माझ्या कुटुंबाची:

Share

अस्सल चवीची नैसर्गिक उत्पादने

आपल्या कोकणाच्या मातीतील सर्व नैसर्गिक उत्पादने , अस्सल चवीची आणि सर्वात महत्वाच म्हणजे कोणत्याही रसायनिक खताचा वापर न केलेली आणि अश्या अनेक वस्तू ज्या आपण धावपळीच्या जीवनात मागे ठेवल्या त्या वस्तू #आजोबा मध्ये मिळतील जसे लाकडी घाण्याचे सर्व प्रकारचे तेल, सर्व प्रकारचीं पिठे , सर्व प्रकारची सरबते,ताक आणि सांडगी मिरची , हळद पावडर ,मध, आंब्याची ची सर्व उत्पादने, जाम, लाल आणि उकडे तांदूळ अश्या अनेक वस्तू आपल्याला #आजोबा मध्ये उपलब्ध आहेत.