Amit Tambe

Amit Tambe PROUD TO BE INDIAN

25/10/2024
25/10/2024
25/10/2024

निवडणूक आयुक्तांच्या अनुमतीनंतर अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा होणार..

जिल्ह्यातील शेतकरी पीक नुकसान अनुदानासाठी पाठपुरावा सुरू!

धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच नदी-नाल्यांना आलेल्या पुरामुळे अनेक ठिकाणी मोठे नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासनाला अतिवृष्टी तसेच पुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार त्यांनी ४ ऑक्टोबर रोजी विभागीय आयुक्तांच्या मान्यतेने राज्याच्या मुख्य सचिवांकडे पीक नुकसानीचा अहवाल सादर केला होता. मुख्य सचिवांनी त्यास मान्यता दिली आहे. निवडणूक आयुक्तांच्या मान्यतेसाठी हा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. त्यांच्या अनुमतीनंतर हेक्टरी १३ हजार ८०० रूपयांचे अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धाराशिव तालुक्यातील वाडी व वाडी बामणी येथे बैठक घेऊन
नागरिकांशी संवाद साधला. यावेळी स्थानिक प्रश्नांवर चर्चा करुन त्यांनी ग्रामस्थांच्या समस्याही जाणून घेतल्या. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी (एनडीआरएफ) व राज्य आपत्ती प्रतिसाद निधी (एसडीआरएफ) मार्फत शेतकर्‍यांना नुकसानीपोटी १३ हजार ८०० रूपयांचे अनुदान दिले जाते. राज्यातील काही जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात नुकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या खात्यावर १३ हजार ८०० रूपयांप्रमाणे अनुदानाची रक्कम जमा होण्यास प्रारंभ झाला आहे.

आपल्या धाराशिव जिल्ह्यातील ५८ पैकी ३७ महसूल मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. त्याचबरोबर ज्या ठिकाणी अतिवृष्टी झालेली नाही. अशा अनेक ठिकाणी नदी-नाल्यांना आलेल्या पुरामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जिथे अतिवृष्टी झाली, तेथील पंचनामे प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर ज्या ठिकाणी अतिवृष्टी नाही, मात्र पुराच्या पाण्यामुळे शेतीचे आणि पिकांचे मोठे नुकसान झाले आहे, तेथील पंचनामे करण्याचे निर्देश आपण जिल्हा प्रशासनाला दिले होते.

निवडणूक आयुक्तांच्या अनुमातीसाठी हा प्रस्ताव सादर करण्यात आला असून त्यांच्या अनुमतीनंतर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या खात्यावर नुकसान अनुदान प्राप्त होण्याचा मार्ग मोकळा होईल. त्यासाठी आपण सातत्याने पाठपुरावा करीत आहोत.

#पीक_नुकसान #अनुदान #धाराशिव

25/10/2024
05/10/2024

नमस्कार धाराशिवकर, आपणास कळवण्यात येत आहे कि SS मोबाईल धाराशिवची मुख्य शाखा हि जिजाऊ चौक, बार्शी नाका येथेच आहे. क्षिरसागर बंधू यांची दुसरी शाखा कुठेही नाही. खूप साऱ्या ऑफर्सचा लाभ घेण्यासाठी आजच भेट द्या SS मोबाईल मुख्य शाखा जिजाऊ चौक, बार्शी नाका धाराशिव.

आपला माणूस ऋषी क्षिरसागर

01/10/2024
01/10/2024

तुळजापूर शहरातील गोस्वामी (गोसावी) समाजासाठी स्मशानभूमीसाठी (दफन भूमी) जागा उपलब्ध करून द्यावी, या मागणीसाठी समाज बांधवांनी भेट घेऊन मागणीचे निवेदन दिले..

यावेळी समाज बांधवांशी संवाद साधला व त्यांच्या अडी-अडचणी समजून घेतल्या. समाजासाठी आवश्यक असलेली स्मशानभूमीसाठी (दफन भूमि) जागा उपलब्ध करून देण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू, असे आश्वासन यावेळी त्यांना दिले..

यावेळी अध्यक्ष श्री.हनुमंत रामचंद्र गोसावी, उपाध्यक्ष श्री.अमर बबन पुरी, सचिव श्री.अमर प्रकाश गिरी, प्रदेशाध्यक्ष श्री.धन्यकु‌मार विजयकुमार पुरी, पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांची उपस्थित होती.

#गोसावी_समाज #स्मशानभूमी #मागणी #तुळजापूर

Address

Tuljapur
413501

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Amit Tambe posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share