Yashashri Healthy Amla Products.

Yashashri Healthy Amla Products. Healthy Ayurvedic amla product.

29/12/2023
जय जिजाऊ, जय शिवराय 🙏🚩मी. सौ: सुषमा विकास पाटील. (सांगली महिला ग्रुप ॲडमिन) यशश्री हेल्दी आवळा प्रोडक्ट्स.मुंबई येथील कल...
07/11/2023

जय जिजाऊ, जय शिवराय 🙏🚩
मी. सौ: सुषमा विकास पाटील. (सांगली महिला ग्रुप ॲडमिन) यशश्री हेल्दी आवळा प्रोडक्ट्स.

मुंबई येथील कल्याण नगरीमध्ये दिनांक 4 आणि 5 नोव्हेंबर 2023 रोजी "मराठा उद्योजक लॉबीचा " 6वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. या कार्यक्रमासाठी आमची सांगली मराठा उद्योजक लॉबी टिम हजर होती.
त्याचबरोबर तेथील मेळाव्यामध्ये आपल्या सांगली टीम कडून तीन वेगवेगळ्या प्रॉडक्टचे स्टॉल लावले होते ....त्या प्रॉडक्टचा सेल अगदी छान प्रकारे झाला.... *दोनच दिवसांमध्ये आमच्या तिन्ही स्टॉलचे प्रॉडक्ट विक्री 26,500/- पर्यंत झाली.* त्याचबरोर आमच्या प्रोडक्ट साठी मोठे होलसेलर ही मिळाले.

प्रत्येक मान्यवर येऊन आमच्या स्टॉलला भेट देऊन आपल्या सांगलीकरांचे प्रॉडक्ट टेस्ट करून.. "कॉलिटी एक नंबर आहे" हा शब्द उच्चारत होते ...त्याचप्रमाणे मराठा उद्योजक.. लॉबीच्या या वर्धापन दिनानिमित्त सर्व पदाधिकारी व मराठा व्यवसायिक बांधव यांच्याशी नवीन ओळख झाली व व्यवसाय वाढीसाठी खूप छान मार्गद र्शन मिळाले...

"एकत्र तर सर्वत्र" हे लॉबीचे घोषविधान आहे, त्याप्रमाणे कल्याणमध्ये सर्व जिल्ह्यातील मराठा बांधव एकत्र येऊन या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
लॉबीचे सर्व कार्यकर्ते आपापली जबाबदारी अगदी प्रामाणिकपणे उत्साहाने पार पाडत होते. यामध्ये कोणताही वेगळेपणा अजिबात जाणवला नाही. तसेच इतरांप्रमाणे आमचीही तेथे राहणे व जेवणाची सोय अगदी उत्तम प्रकारे केली होती.

मला सांगण्यास अभिमान वाटतो की आम्ही कल्याण मधून येताना मराठा लॉबी कडून काय घेऊन आलो तर प्रत्येक गोष्टीतील शिस्तबद्धपणा, त्यांच्यातील एकत्रितपणा, सर्वांबरोबर दाखवलेला आपुलकीपणा ,आणि एकमेकांबरोबर अगदी प्रेमाने बोलणे आणि प्रेमाने राहणे, हे मोलाचे संस्कार मराठा लॉबी कडून मिळाले.

आपण सर्व एकाच कुटुंबातील आहोत आणि हा सर्व मोठा मराठा वर्ग आपलाच परिवार आहे हा, अनुभव तेथे अनुभवायला मिळाला .

ज्याप्रमाणे लॉबीने आम्हाला व्यवसाय मिळवून दिला, त्याचप्रमाणे किती तर पटीने चांगल्या माणसांची ओळख करून दिली. व्यवसाय या निमित्ताने खूप चांगले अनुभव येथे अनुभवायला मिळाले. अगदी खेड्यापाड्यातील सामान्य व्यवसायिकांना याचा खूप छान प्रकारे लाभ होत आहे.

सर्व पदाधिकारी आणि सदस्यांचे खूप खूप मनापासून आभार कारण एकत्रित येऊन पूर्ण मनापासून आपुलकीने कार्य करणारे थोर मावळे आपल्या मराठा उद्योजक लॉबीला लाभले आणि तुमच्या सर्वांच्या सहकार्याने लॉबीच्या छोट्याशा रोपट्याचा आता मोठ्या वटवृक्षांमध्ये विस्तार होत आहे.

🙏🚩 *धन्यवाद मराठा उद्योजक लॉबी🚩🚩*
*एकत्र तर सर्वत्र* 🤝🤝
*सुषमा पाटील*..
*यशश्री हेल्दी आवळा प्रोडक्स, बुधगांव, सांगली*
*कॉन्टॅक्ट नंबर 88 30 22 69 83*

29/09/2023

यशश्री हेल्दी आवळा प्रोडक्ट ...सुषमा पाटील...कॉन्टॅक्ट नंबर 88 30 22 69 83

Address

Ganeshnagar And Near To Rajwada
Budhgaon

Telephone

+918830226983

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Yashashri Healthy Amla Products. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Yashashri Healthy Amla Products.:

Share