shravan Gurav

shravan Gurav 2 लाखांपेक्षा जास्त लोकांना उद्योग व्यवसाय, स्टार्टअप नवनिर्मिती नवसंकल्पना, मार्गदर्शन करणारी कम्युनिटी उद्योजकता विकास कम्युनिटी.

उद्योगातल्या यशाची त्रिसूत्री - वेळ, पैसा आणि नियोजन.आम्ही उद्योगिनीच्या माध्यमातून उद्योजक घडवण्यासाठी आम्ही कुठलेच पैस...
13/07/2024

उद्योगातल्या यशाची त्रिसूत्री - वेळ, पैसा आणि नियोजन.
आम्ही उद्योगिनीच्या माध्यमातून उद्योजक घडवण्यासाठी आम्ही कुठलेच पैसे घेत नाही. उद्योजकांनी कर्ज घेतले असल्यास व्याजावर व्याज चढू दिलं नाही तरच, तो उद्योग वाचू शकतो. उद्योजकांनी आर्थिक नियोजन कसे करावे, याबाबतही आम्ही मार्गदर्शन करतो. वेळ, पैसे यांचं व्यवस्थापन आणि मनुष्यबळ ही उद्योगाची त्रिसूत्री आहे. कोणतेही काम आज केले पाहिजे, उद्या कधीच येत नसतो, असं माझं ठाम मत आहे. उद्योग यशस्वी करायचा असेल तर उत्पादनाचे मार्केटिंग महत्त्वाचे असते. मी ब्रँडेड फूड प्रॉडक्टच्या दुकानांबाहेर उत्पादनांचं मार्केटिंग केलं आहे. जिथे महिला आहेत तिथे मार्केटिंग करा, ‘उद्यमेन ही सिध्यन्ति कार्याणि न मनोरथैः म्हणजेच तुम्हाला जर एखादा उद्योग करायचा असेल, तर तुम्ही आळस सोडा, अधिक कार्य करा आणि कृती करा म्हणजे कोणतेही कार्य असाध्य नाही. फक्त अहोरात्र मेहनत करा असे मी सांगते.

ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठीच्या संधी सतत हेरत राहिलं पाहिजे. पूर्वी मंत्रालयात ‘कन्झ्युमर कोऑपरेटिव्ह स्टोअरमध्ये’ १०० रुपये घेऊन एक टेबल लावायला द्यायचे. तिथेही विक्री केली जायची. मग हळूहळू शाळा, बँक्स, हॉस्पिटल्समधल्या महिला वर्गापर्यंत उत्पादनविक्री सुरू झाली. मग ज्या ठिकाणी स्त्री नोकरदारांची संख्या जास्त आहे, तेथेच जायचे एखाद्या मैत्रिणीच्या ओळखीने ‘लंचटाइम’मध्येच जायचे आणि दर महिन्याच्या २५ ते ५ तारखेदरम्यानच जायचे, कारण तो काळ पगाराचा असतो. अशा प्रकारच्या संधींचा सतत शोध घ्यायला हवा असं मला वाटतं.

वेळेचे, पैशाचे नियोजन, मार्केटिंग कसे करावे या प्रश्नांची उत्तरं देणारी संघटना म्हणजे आमची ‘आम्ही उद्योगिनी’
उद्योग कसा सुरू करावा,* तो यशस्वीरित्या पुढे कसा रेटावा, आपल्याला कोणत्या सरकारी योजना उपयुक्त ठरतील, वेळेचे, पैशाचे नियोजन, मार्केटिंग कसे करावे या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देणारी संघटना म्हणजे आमची “आम्ही उद्योगिनी” आहे. तेव्हा तुम्हाला कुठलाही उद्योग सुरू करायचा असेल आणि त्यात यशस्वी व्हायचे असेल तर स्वतःच्या क्षमतांची आधी पारख करा. कोणतीही महिला घरची जबाबदारी झटकू शकत नाही. त्यामुळे त्या जबाबदाऱ्या पेलून तुम्ही पुढे जा. मिळालेल्या संधीचं सोनं करा. वाटेत येणाऱ्या अडथळ्यांवर तुम्ही कशी मात कराल याचा अभ्यास करा. अशा अनेक पैलूंचा विचार करून तुम्ही व्यवसायात उतराल, तर तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल असा माझा यशाचा कानमंत्र आहे.

उद्योजक होण्यासाठी यश मिळेपर्यंत आणि मिळाल्यानंतरही अविश्रांत काम करण्याची तयारी असणं आवश्यक आहे.
माझ्या मते, उद्योजक होण्यासाठी यश मिळेपर्यंत आणि मिळाल्यानंतरही अविश्रांत काम करण्याची तयारी असणं आवश्यक आहे. आपण जे काम करतो त्याच्याबद्दल आदर हवा. समोरच्याचा विश्वास कमावता यायला हवा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या कामाला अध्यात्माची सांगड हवी असं मला वाटत. आपल्याकडे कॉलेजमधील विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणासह उद्योगाबाबत जनजागृती करण्याची गरज असल्याचे मला वाटते.

श्रावण गुरव- (फाउंडर एस.जी क्रिएशन इंडस्ट्री कंपनी प्रायव्हेट लिमिटेड,इडीपी प्रोग्राम हेड ब्लाॅगर,लेखक, बिझनेस डेव्हलपमेंट कोच, स्टार्टअप ॲडव्हायझर, संपर्क-+919322567546)
EveryoneK

अनेकजण असे म्हणतात की,जिंकण किंवा हरणं हे आपल्या नशिबावर अवलंबून असतं पण खरंतर हे चूक आहे कारण ते नशिबावर नाही तर आपल्या...
13/07/2024

अनेकजण असे म्हणतात की,जिंकण किंवा हरणं हे आपल्या नशिबावर अवलंबून असतं पण खरंतर हे चूक आहे कारण ते नशिबावर नाही तर आपल्या मानसिकतेवर आणि आपल्या प्रयत्नांवर अवलंबून असते.जर का समोर हार दिसतं असताना देखील आपण त्याकडे सकरात्मकरित्या पाहत असू आणि शेवटपर्यंत प्रयत्न करत असू तर आपल्याला त्यामध्ये नक्कीच यश मिळते. उदाहरण घ्यायचेच झाले तर भारताने टी 20 वर्ल्डकपचा शेवटचा सामना कसा जिंकला याचे नक्कीच घेऊ शकता. त्यामुळे आयुष्यात काही झालं तरी लगेच हार मानून बसू नका, शेवटपर्यंत लढत रहा, नक्कीच विजयी व्हाल...

✍️ ॲडव्हान्स बिझनेस संकल्पना स्टार्टअप स्टॅटजीज,उद्योग आणि कंपनी फॅक्टरी मॅनेजमेंट,
Ai,Websites,Ai,Softwares,SaleStategys,TeamHandling,ब्रॅंण्डिंग,ॲड,प्रमोशन,आमच्या विश्वसनीय कम्युनिटी आणि कंपनीद्वारे संपूर्ण भारतामध्ये पुरवले जाते अधिक माहितीसाठी आणि ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सहभागी होण्यासाठी वरील नंबरवर संपर्क साधा.😊👍🤝🎯

13/07/2024
11/03/2024

फक्त पैसे खर्च केले म्हणजे चांगली जाहिरात होत नाही.
By श्रावण गुरव

उद्योग किंवा व्यवसाय, मग तो कुठल्याही प्रकारचा असो, त्याचे मूळ म्हणजेच पाया किंवा ‘फाऊंडेशन’ हे मार्केटिंग असते किंवा असायला पाहिजे हे आता जवळ जवळ सिद्ध झाले आहे. ज्यांना मार्केटिंग कळते, समजते, उमजते, जमते त्यांची वेगाने प्रगती होताना दिसते. ज्यांना हे जमत नाही ते मागे रहातात असे चित्र सध्या दिसते आहे. उद्योग व्यवसायाच्या क्षेत्रात बाकी काही नाही आले तरी चालेल पण मार्केटिंग यायला हवे अशी एक नवीन अट उदयाला येऊ लागली आहे.

‘मार्केट सर्व्हे’ हे कुठल्याही मार्केटिंगचे मूळ म्हणजे पाया असतो किंवा असायला हवा. ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया असते. यातून अनेक आश्चर्यकारक गोष्टी कळत असतात. आपले प्रॉडक्ट किंवा सर्विस का विकली जात नाही हे जसे कळते तसेच का विकली जाते हे पण कळते.
1970 च्या सुमारास ब्रिटनमधल्या एका प्रसिद्ध फूड प्रॉडक्ट कंपनीने ‘केक मिक्स’ नावाचे एक नवीन प्रॉडक्ट बाजारात आणले. त्या वेळी ब्रिटन तसेच अनेक युरोपियन देशांमध्ये घरोघरी केक बनायचे. अनेक कारणांसाठी – जसे की वाढदिवस, लग्न समारंभ, धार्मिक सण किंवा उत्सव – केक्स तयार केले जायचे. केक बनवण्याचे काम बहुतेक करून घरातील गृहिणी करायच्या. केक बनवण्याची पद्धत तशी अवघड आणि गुंतागुंतीची होती. यामध्ये गृहिणींचा बराच वेळ जायचा. केकमिक्समुळे ही पद्धत एकदम सोपी झाली होती. केकमिक्सचे मिश्रण भिजवून केकच्या भांड्यात ठेवले आणि ते भांडे ओव्हनमध्ये ठेवले की केक तयार होत असे. त्यामूळे गृहिणीचा बराच वेळ, कष्ट आणि ताकद वाचत असे. बघताबघता हे प्रॉडक्ट लोकप्रिय झाले. केकमिक्सच्या विक्रीचा ग्राफ वरवर जाऊ लागला. कंपनीला प्रॉडक्शन पण वाढवावे लागले.

केकमिक्सची विक्री अजून वाढावी म्हणुन कंपनीने जाहीरातींचा उपयोग करायचे ठरवले. त्यासाठी एक ‘ऍड कॅम्पेन’ ची योजना आखण्यात आली. यासाठी ज्या जाहिराती करायच्या होत्या त्या साठी ‘Cake Mix Makes The Best Cakes’ (केकमिक्स सर्वोकृष्ट केक तयार करतो) अशी स्लोगन वापरायचे ठरले. त्याप्रमाणे जाहिराती तयार करण्यात आल्या आणि त्या प्रसिद्ध पण होऊ लागल्या. आधीआधी या जाहिरातींना उत्तम प्रतिसाद मिळू लागला. केकमिक्सचा सेल वाढू लागला. पण एकदम काय झाले कोणास ठाऊक! केकमिक्सचा सेल ढेपाळू लागला. त्याच्या विक्रीचे ग्राफ्स वेगाने खाली खाली येऊ लागले. कोणाएकेकाळी ‘सुपर हिट’ असलेले हे प्रॉडक्ट कोणी घेईनासे झाले. प्रॉडक्टची क्वालिटी उत्तम होती. ज्यांनी प्रॉडक्ट घेतले त्यातील बहुतांशी ग्राहक समाधानी होते. किंमती रास्त म्हणजे परवडणार्‍या होत्या. मार्केटमध्ये कोणाची कॉम्पीटिशन किंवा स्पर्धा पण नव्हृती. केकचे उत्पादन पण कमी झाले नव्हते. मग आपल्या प्रॉडक्टच्या विक्रीला एकदम गळती का लागली हे काही केल्या कंपनीला समजत नव्हते.

शेवटी विक्री कमी का होते हे शोधून काढण्यासाठी कंपनीने एका मार्केटिंग कन्सल्टंटची नेमणूक केली. त्याचे सहा महिने मार्केट सर्व्हे केला आणि फक्त एक पानी रिपोर्ट कंपनीला सादर केला. त्याने जाहिरातींसाठी ‘Cake Mix HELPS making BETTER Cakes‘ (केकमिक्स अधिक चांगला केक तयार करण्यासाठी मदत करते) अशी स्लोगन वापरायला सांगितली. कंपनीला आधी ही स्लोगन आवडली नाही. पहिल्या स्लोगनपेक्षा ही स्लोगन बरीच मिळमिळीत वाटली. कंपनीमध्ये कोणालाच ही स्लोगन फारशी आवडली नाही. पण शेवटी कंपनीने ही स्लोगन वापरून जाहिराती करायला सुरवात केली. आणि काय आश्चर्य? केकमिक्स सेल एकदम वाढायला लागला. विक्रीचा ग्राफ वरवर जायला लागला. केवळ एक स्लोगन बदलल्यामूळे हे आश्चर्य घडले.
कंपनीने याचे कारण मार्केटिंग कन्सल्टंटला विचारले तेव्हा त्याला मार्केट सर्व्हेमध्ये जे आढळून आले ते सांगितले...

त्याला आढळून आले की जेव्हा एखादी गृहिणी आपल्या कुटुंबियांसाठी किंवा एखाद्या व्यक्तिसाठी केक तयार करत असते त्यावेळी ती आपल्या पाक कौशल्याबरोबरच तिच्या मनातील प्रेम, जिव्हाळा, वात्सल्य, आत्मियता, कौतुक, आलेपणा, आदर अशा अनेक भावना ओतत असते. तसेच आपण तयार केलेला केक हा आधीच्या केकपेक्षा जास्त चांगला व्हावा अशी तिची धडपड असते. पहिल्या स्लोगनमध्ये गृहिणीला तिचे पाककौशल्य दाखवायला, आपल्या भावना ओतायला आणि अधिक चांगला केक बनवायला कोणता वावच नाही असे अनेक गृहिणींना वाटू लागले. म्हणून त्यांनी केकमिक्स हे प्रॉडक्ट विकत घेणे बंद केले. पण दुसर्‍या स्लोगनमुळे त्यांना समजले की त्यांना त्यांचे पाककौशल्य दाखवायला, भावना ओतायला वाव तर आहेच पण केकमिक्सच्या मदतीने आणखी चांगला केक बनवायला पण वाव आहे. त्यामुळे केकमिक्सच्या विक्रीमध्ये लक्षणीय वाढ झालेली दिसते.

अ‍ॅडव्हरटाईजमेन्ट म्हणजेच जाहिरातबाजी हे पण मार्केटिंगचे प्रमुख अंग आहे. जाहिरातींमध्ये स्लोगन्स फार महत्वाच्या असतात. जास्तीत जास्त आकर्षक स्लोगन्स बनवण्याकडे अनेकांचा कल असतो. पण ज्या ग्राहकांसाठी (याला टारगेट ऑडियन्स म्हणतात) या जाहिराती तयार करण्यात येतात, त्या ग्राहकांची एकूण मनोवृत्ती, विचार करण्याची पद्धत, भावना याची पण माहिती असणे आवश्यक असते. नाहीतर भरपूर पैसे खर्च करून केलेले ऍड कॅम्पेन्स अयशस्वी होऊ शकतात.
यावरून काय तो धडा घ्यायचा किंवा घ्यायचा नाही हे ज्याने त्याने ठरवायचे.
-श्रावण गुरव { बिझनेस डेवलोपेमेंट कोच,स्टार्टअप अडव्हायसार. #कोल्हापूरकर GuravVaibhav Dhus

2 लाखांपेक्षा जास्त लोकांना उद्योग व्यवसाय, स्टार्टअप नवनिर्मिती नवसंकल्पना, मार्गदर्शन करणारी कम्युनिटी उद्योजकता विकास कम्युनिटी.

🎯व्यवसाय धोरण कसे तयार करावे ?एक मजबूत व्यवसाय धोरण तयार करण्यामध्ये एक पद्धतशीर दृष्टीकोन समाविष्ट असतो जो आपल्या संस्थ...
11/03/2024

🎯व्यवसाय धोरण कसे तयार करावे ?
एक मजबूत व्यवसाय धोरण तयार करण्यामध्ये एक पद्धतशीर दृष्टीकोन समाविष्ट असतो जो आपल्या संस्थेच्या विविध पैलूंचा आणि बाह्य व्यावसायिक वातावरणाचा विचार करतो. यशस्वी व्यवसाय धोरण तयार करण्यासाठी येथे एक संक्षिप्त मार्गदर्शक आहे:
1. तुमची दृष्टी आणि ध्येय परिभाषित करा
तुमची दीर्घकालीन दृष्टी आणि ध्येय स्पष्टपणे स्पष्ट करा. तुमची दृष्टी तुम्‍ही काय साध्य करण्‍याचे उद्दिष्ट दर्शविते, तर तुमच्‍या मिशनमध्‍ये तुम्‍ही ती उद्दिष्टे कशी गाठाल हे परिभाषित करते.
2. SWOT विश्लेषण
सखोल SWOT विश्लेषण करा—तुमची ताकद, कमकुवतपणा, संधी आणि धोके यांचे मूल्यांकन करा. या अंतर्गत आणि बाह्य घटकांना समजून घेणे रणनीती विकासासाठी एक पाया प्रदान करते.
3. स्पष्ट उद्दिष्टे सेट करा
विशिष्ट, मोजण्यायोग्य, साध्य करण्यायोग्य, संबंधित आणि कालबद्ध (SMART) उद्दिष्टे स्थापित करा. हे तुमची प्रगती मोजण्यासाठी आणि निर्णय घेण्याचे मार्गदर्शन करण्यासाठी बेंचमार्क म्हणून काम करतात.
4. तुमची बाजारपेठ जाणून घ्या
ग्राहकांच्या गरजा, प्राधान्ये आणि उद्योग कल समजून घेण्यासाठी बाजार संशोधन करा. तुमचे लक्ष्यित प्रेक्षक ओळखा आणि अंतर आणि संधी शोधण्यासाठी स्पर्धकांचे विश्लेषण करा.
5. तुमचा स्पर्धात्मक फायदा निवडा
तुमचा व्यवसाय काय वेगळे करतो ते परिभाषित करा. हे नावीन्य, खर्चाचे नेतृत्व, ग्राहक सेवा किंवा अद्वितीय मूल्य प्रस्ताव असू शकते. तुमच्या ब्रँडला बाजारात स्थान देण्यासाठी हा फायदा घ्या.
6. कृती करण्यायोग्य धोरणे विकसित करा
तुमची उद्दिष्टे कृती करण्यायोग्य धोरणांमध्ये भाषांतरित करा. यामध्ये प्रमुख उपक्रम, संसाधनांचे वाटप आणि अंमलबजावणीसाठी टाइमलाइन निश्चित करणे समाविष्ट आहे.
7. अंमलबजावणी आणि मॉनिटर
चांगल्या-परिभाषित कृती योजनेसह तुमची रणनीती अंमलात आणा. नियमितपणे प्रगतीचे निरीक्षण करा, बदलत्या परिस्थितीशी जुळवून घ्या आणि उद्भवलेल्या कोणत्याही आव्हानांना सामोरे जा.
8. लवचिक संस्कृती वाढवा
तुमच्या संस्थेमध्ये अनुकूलता आणि नावीन्यपूर्णतेला प्रोत्साहन द्या. एक लवचिक संस्कृती बाजारपेठेतील बदलांना आणि ग्राहकांच्या बदलत्या मागण्यांना त्वरित प्रतिसाद देण्यास सक्षम करते.
9. तंत्रज्ञान स्वीकारा
प्रक्रिया सुव्यवस्थित करण्यासाठी, कार्यक्षमता वाढविण्यासाठी आणि स्पर्धात्मक राहण्यासाठी तंत्रज्ञानाचा समावेश करा. माहितीपूर्ण निर्णय घेण्यासाठी डेटा अॅनालिटिक्सचा फायदा घ्या आणि तुमच्या उद्योगातील तांत्रिक प्रगतीची माहिती ठेवा.
10. जोखीम व्यवस्थापन
संभाव्य धोके ओळखा आणि शमन करण्याच्या धोरणे विकसित करा. जोखीम व्यवस्थापनासाठी सक्रिय दृष्टीकोन अनिश्चिततेचा सामना करताना लवचिकता सुनिश्चित करतो.
11. ग्राहक-केंद्रित दृष्टीकोन
ग्राहकांच्या समाधानाला प्राधान्य द्या आणि दीर्घकालीन संबंध निर्माण करा. ग्राहकांच्या फीडबॅकला समजून घ्या आणि प्रतिसाद द्या, तुमची उत्पादने किंवा सेवा सतत सुधारत रहा.
12. नियमितपणे पुनरावलोकन करा आणि समायोजित करा
तुमच्या रणनीतींच्या परिणामकारकतेचे वेळोवेळी मूल्यांकन करा. मार्केट डायनॅमिक्स विकसित होते, त्यामुळे स्पर्धात्मकता टिकवून ठेवण्यासाठी तुमचा दृष्टिकोन समायोजित करण्यासाठी तयार रहा.
हे घटक एकत्रित करून, तुम्ही एक व्यापक व्यवसाय धोरण तयार कराल जे तुमच्या संस्थेच्या उद्दिष्टांशी संरेखित होईल आणि शाश्वत यशासाठी तुम्हाला स्थान देईल.
-श्रावण गुरव
(फाउंडर-एस.जी क्रिएशन इंडस्ट्री कंपनी प्रा.लि)
(+919322567546)
स्टार्टअप मॅनेजमेंट ॲडव्हायझर,कोच,बिझनेस डेव्हलपमेंट हेड.
#व्यवसाय #चंदगड #कोल्हापूरकर Chetan Narake Savita Chandgadkar Santosh Malvikar Satej D. Patil Sangramsinh Kupekar Dhananjay Mahadik MP Kolhapur Pune Business Group Gadhinglaj/Ajara/Chandgad Businesses Group

🎯🎯🎯🎯🎯🎯All Business Devlopment And Entrapranurship Solutions... Innovation and Creativity Improve your Skills...पुर्ण भार...
15/02/2024

🎯🎯🎯🎯🎯🎯All Business Devlopment And Entrapranurship Solutions... Innovation and Creativity Improve your Skills...पुर्ण भारतामध्ये सेवा पुरवत असलेली नामवंत कंपनी,हजारो लाखो उद्योजक आज नवनिर्मिती नवसंकल्पना शिकत आहेत, यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित इडीपी प्रोग्राम पुर्ण भारतात पुरवला जातो, ज्यामुळे लाखो तरूणांच भविष्य आज उज्ज्वल होत आहे,अशी ही एस.जी क्रिएशन इंडस्ट्री कंपनी प्रायव्हेट लिमिटेड... उद्योजकता विकास कम्युनिटी मध्ये सहभागी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क साधून सहभागी होऊ शकता आणि तुम्ही देखील,सक्सेसफुल उद्योजक बनण्याचा विचार करत असाल तर तुमच्या विचारांना संकल्पनेला पाठींबा सपोर्ट करण्यासाठी तुमच्या सोबत आहे, एस.जी क्रिएशन इंडस्ट्री कंपनी प्रायव्हेट लिमिटेड आणि उद्योजकता विकास कम्युनिटी.... संपर्क-श्रावण गुरव(फाउंडर -एस.जी क्रिएशन इंडस्ट्री कंपनी प्रायव्हेट लिमिटेड बिझनेस डेव्हलपमेंट कोच, स्टार्टअप ॲडव्हायझर, स्टार्टअप ॲडव्हायझर,ब्लाॅगर लेखक युट्यूबर मोटीवेशनल स्पिकर, ॲडव्हर्टायझिंग ॲन्ड मार्केटिंग हेड) +919322567546

Address

At Satavane Tal Chandgad
Gadhinglaj
416509

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm

Telephone

+919322567546

Alerts

Be the first to know and let us send you an email when shravan Gurav posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to shravan Gurav:

Share

Category