Aapli Sheti

Aapli Sheti शेतीविषयक नवीन माहिती, पीक व्यवस्थापन, पशुपालन, आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी उपयोगी टिप्स मिळतील

04/08/2026

#आपलीशेती #कीटकनाशकफवारणी

असुरक्षित फवारणीचा जीवघेणा खेळ: पिकांवर कीटकनाशक मारताना बाळगा ही काळजी!

सध्या शेतात पिकांवर कीटकनाशक फवारणीचा हंगाम वेगात सुरू आहे. मात्र, अनेक शेतकरी उपाशीपोटी राहून, तंबाखू, धूम्रपान किंवा मद्यपान करून कीटकनाशकांची फवारणी करत असल्याचे समोर आले असून यामुळे थेट जिवाला धोका निर्माण झाला आहे.
पावसाने उसंत दिल्याने सध्या कापूस, सोयाबीन व इतर पिकांवर कीटकनाशक फवारणी करण्याचे प्रमाण वाढले आहे. कीटकनाशक हे विषारी द्रव्य असल्याने फवारणी करताना योग्य खबरदारी न घेतल्यास फवारणी करणाऱ्याच्या जीवाला धोका होऊ शकतो. यापूर्वी विषबाधा होऊन अनेकांच्या जीव गेल्याच्या घटनाही घडल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी फवारणी करताना खालील गोष्टींची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.
सुरक्षित कपडे आणि उपकरणे: फवारणी करताना अंगरक्षक कपडे, हातमोजे, चष्मा, मास्क आणि बूट किंवा गमबूट यांचा वापर करणे गरजेचे आहे, जेणेकरून कीटकनाशक अंगामध्ये किंवा त्वचेला लागणार नाही.
लेबलबद्दल माहिती: कीटकनाशक वापरण्यापूर्वी लेबल आणि माहिती पत्रकावरील सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात आणि दिलेल्या माहितीनुसारच फवारणी करावी. फवारणीनंतर साबनाने हात स्वच्छ धुणे आवश्यक आहे.
वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने फवारणी टाळा: वाऱ्याच्या दिशेचा अंदाज घेऊन फवारणी करावी. वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने फवारणी केल्यास कीटकनाशके अंगावर उडण्याची शक्यता असते.
तंबाखूचे सेवन टाळा: फवारणी करताना तंबाखू किंवा धूम्रपान करू नये, कारण त्यामुळे कीटकनाशक पोटात जाण्याची शक्यता वाढते. तसेच मिश्रणात हात न घालता लाकडाच्या किंवा काठीचा वापर करावा.
पंपाट हवा फुंकू नका: फवारणी करताना नोजल बंद झाल्यास तोंडाने फुंकून किंवा ओढून ती स्वच्छ करण्याचा प्रयत्न करू नये.
योग्य प्रमाणात फवारणी: कीटकनाशकांची शिफारस केलेल्या प्रमाणापेक्षा जास्त फवारणी करू नये, अन्यथा पिकांचे नुकसान व मानवी आरोग्याला हानी पोहोचू शकते.
तज्ञांचे आवाहन: कीटकनाशक हे अधिकृत परवानाधारक विक्रेत्याकडूनच खरेदी करावे आणि त्याची पक्की पावती घ्यावी. फवारणी शक्यतो सकाळी किंवा सायंकाळी करावी, कडक उन्हात फवारणी टाळावी, असे कृषी विकास अधिकारी किरण खोमणे यांनी सुचवले आहे. विषबाधा झाल्यास तत्काळ रुग्णालयात दाखल होण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.

    #आपलीशेती #शेतकरीमाहिती #सरकारीयोजना
03/08/2026




#आपलीशेती
#शेतकरीमाहिती
#सरकारीयोजना

 #सोयाबीन  #कृषीसल्ला #शेतकरी #कीटकनाशकफवारणी #बुरशीनाशक #आपलीशेती कीटकनाशके आणि बुरशीनाशकांचा प्रभाव चांगला होण्यासाठी ...
02/08/2026

#सोयाबीन

#कृषीसल्ला
#शेतकरी
#कीटकनाशकफवारणी
#बुरशीनाशक
#आपलीशेती

कीटकनाशके आणि बुरशीनाशकांचा प्रभाव चांगला होण्यासाठी फवारणीनंतर पुरेसा कोरडा कालावधी आवश्यक असतो. फवारणीनंतर लगेच जोरदार पाऊस झाल्यास औषधाचा परिणाम कमी होऊ शकतो.

कृषी तज्ज्ञांच्या मते, सोयाबीन पिकात कीटकनाशकांची फवारणी केल्यानंतर किमान ४ ते ६ तास पाऊस पडू नये. तसेच बुरशीनाशकांची फवारणी केल्यानंतर सुमारे ६ तास पाऊस पडू नये. त्यामुळे औषध पानांवर व्यवस्थित चिकटून वनस्पतीमध्ये शोषले जाते आणि अपेक्षित परिणाम मिळतो.
जर फवारणीनंतर १–२ तासांच्या आत जोरदार पाऊस झाला, तर औषधाचा परिणाम कमी होण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत गरजेनुसार पुन्हा फवारणी करावी लागू शकते.
शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज पाहूनच फवारणी करावी, जेणेकरून औषधाचा जास्तीत जास्त फायदा होईल आणि खर्चही वाचेल.
फवारणीनंतर किती वेळ पाऊस पडू नये?
कीटकनाशके (अळी, पांढरी माशी इ.) : फवारणीनंतर किमान ४–६ तास पाऊस पडू नये.
बुरशीनाशके : फवारणीनंतर किमान ६ तास किंवा त्याहून अधिक पाऊस पडू नये.
सूक्ष्म अन्नद्रव्ये / पाण्यात विरघळणारी खते : फवारणीनंतर ६–८ तास पाऊस पडू नये, म्हणजे चांगला परिणाम मिळतो.
पुढील २४ तासांचा हवामान अंदाज
कमाल तापमान : २८°C
किमान तापमान : २३°C
आकाश : ढगाळ
पावसाची शक्यता : हलका ते मध्यम पाऊस
वाऱ्याचा वेग : १५–२५ किमी/तास
कृषी सल्ला
फवारणी सकाळी लवकर किंवा संध्याकाळी करावी.
तीव्र ऊन किंवा जोरदार वारा असताना फवारणी टाळावी.
योग्य प्रमाणात पाण्याचा वापर करून औषध पानांवर समान रीतीने फवारावे.
औषधाच्या लेबलवरील सूचनांचे काटेकोर पालन करावे.

01/08/2026

Aapli Sheti Ace Agro Fert
@

राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना – २०२६' अंतर्गत १६ लाख ९६ हजार पात्र...
25/07/2026

राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना – २०२६' अंतर्गत १६ लाख ९६ हजार पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली असून उर्वरित पात्र शेतकऱ्यांच्या याद्याही लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिली. या योजनेअंतर्गत राज्यातील सुमारे ५६ लाख पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे. पात्र शेतकऱ्यांनी लाभ मिळविण्यासाठी ॲग्रीस्टॅकवर नोंदणी करून आधार प्रमाणीकरण प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, असे आवाहनही सहकार मंत्री पाटील यांनी केले.

योजनेतील पात्र लाभार्थ्यांची यादी संबंधित बँकांनी महाआयटीने विकसित केलेल्या पोर्टलवर अपलोड केली असून त्याची पडताळणी पूर्ण झाली आहे. आधार प्रमाणीकरणासाठी पात्र शेतकऱ्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एसएमएसद्वारे सूचना पाठविण्यात येणार आहेत. तसेच ग्रामपंचायत कार्यालये, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था आणि संबंधित बँक शाखांमध्येही लाभार्थ्यांच्या याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत.

योजनेतील प्रत्येक पात्र लाभार्थ्याला एक विशिष्ट ओळख क्रमांक देण्यात येणार आहे. आधार क्रमांक किंवा या विशिष्ट क्रमांकाच्या आधारे आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक राहणार असून, राज्यातील सुमारे ३२ हजार 'आपले सरकार सेवा केंद्रांमार्फत ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

#शेतकरीकर्जमुक्ती२०२६
#शेतकरी
#महाकर्जमुक्ती
#कर्जमुक्ती
#महाराष्ट्रशासन

18/07/2026

कापूस कीड व्यवस्थापन: भरघोस उत्पादनासाठी प्रभावी उपाय 🌱
कापूस पिकामध्ये मावा, तुडतुडे, फुलकिडे, पांढरी माशी आणि बोंडअळी यांसारख्या किडी वेळेवर नियंत्रित केल्यास उत्पादनात मोठी वाढ करता येते.
✅ एकात्मिक कीड व्यवस्थापन
पिवळे व निळे चिकट सापळे वापरा.
गुलाबी बोंडअळीसाठी फेरोमोन (कामगंध) सापळे लावा.
पक्षी थांबे (Bird Perches) उभारून नैसर्गिक नियंत्रण करा.
आवश्यकतेनुसार प्रकाश सापळ्यांचा वापर करा.
शेताची नियमित पाहणी करून किडींचा प्रादुर्भाव लवकर ओळखा.
🌿 जैविक नियंत्रण
निंबोळी अर्कासारख्या जैविक उपायांचा वापर करा.
उपयुक्त सूक्ष्मजीव व जैविक कीटकनाशकांचा अवलंब करा.
रासायनिक फवारणीपूर्वी जैविक उपायांना प्राधान्य द्या.
⚠️ रासायनिक फवारणी कधी करावी? किडींचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसानीच्या पातळीपेक्षा जास्त झाल्यानंतरच फवारणी करा. योग्य औषध, योग्य मात्रा आणि योग्य वेळ यांचे पालन करा. एकाच गटातील औषधांचा वारंवार वापर टाळा, जेणेकरून किडींमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण होणार नाही.
🌾 लक्षात ठेवा वेळेवर निरीक्षण + एकात्मिक कीड व्यवस्थापन + शिफारशीनुसार औषधांचा वापर = निरोगी कापूस आणि अधिक उत्पादन.
👉 ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर पोस्ट Like 👍, Share 📲 करा आणि "आपली शेती" पेजला Follow करा.
#कापूस #कापूसकीडव्यवस्थापन #शेतकरी #कृषीमार्गदर्शन #आपलीशेती

13/07/2026

शेतकऱ्यांसाठी उपयुक्त कृषी सल्ला:
"मातीची तपासणी करा, योग्य खतांचा संतुलित वापर करा, दर्जेदार बियाणे निवडा, पिकांची नियमित पाहणी करा आणि किडी-रोगांचे वेळेवर नियंत्रण करा. पाण्याचा काटकसरीने वापर करून आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करा. योग्य नियोजन, योग्य व्यवस्थापन आणि योग्य बाजारपेठ यामुळेच शेती अधिक फायदेशीर होते."

 #आपलीशेती   #शेतकरी #आधुनिकशेती #कृषीमार्गदर्शन #सेंद्रियशेती
13/07/2026

#आपलीशेती

#शेतकरी
#आधुनिकशेती
#कृषीमार्गदर्शन
#सेंद्रियशेती

 #मायकोरायझा #आपलीशेती #जैविकशेती #शेतकरीमार्गदर्शन #सेंद्रियशेती #शेतीमाहिती #कृषीतंत्रज्ञान #स्मार्टशेती
12/07/2026

#मायकोरायझा
#आपलीशेती
#जैविकशेती
#शेतकरीमार्गदर्शन
#सेंद्रियशेती
#शेतीमाहिती
#कृषीतंत्रज्ञान
#स्मार्टशेती

11/07/2026

राज्यात फक्त 17 लाख शेतकऱ्यांचीच संपूर्ण कर्जमाफी? सर्वांनाच मिळणार नाही पूर्ण लाभ

महायुती सरकारनं 36 हजार कोटींची कर्जमाफी योजना मंजूर केली असून राज्यातल्या 56 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ होणार असल्याचा दावा सरकारनं केलाय. मात्र *प्रत्यक्षात फक्त 17 लाख शेतकऱ्यांचंच संपूर्ण कर्ज माफ होणार असल्याची माहिती समोर* आली आहे.

*कारण काय?*

1️⃣ *पहिले कारण,* 2019 मध्ये मविआ सरकारनं थकीत कर्ज माफ केलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा संपूर्ण लाभ मिळणार नाही. आणि अशा शेतकऱ्यांची संख्या 13 लाखांच्या आसपास आहे. या शेतकऱ्यांचं कर्ज जरी दोन लाखांपेक्षा कमी असलं तरी त्यांना केवळ 50 हजारांचाच लाभ मिळणार असून त्यांना कर्जाची उर्वरित रक्कम भरावी लागणार आहे.

2️⃣ *दुसरे कारण,* दोन लाखांपेक्षा जास्त थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना दोन लाखांवरील रक्कम बँकेत जमा केल्याशिवाय दोन लाखांच्या कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही.

सरकारनं जीआरमध्ये नेमक्या कोणत्या अटी घातल्या आहेत आणि *कोणत्या शेतकऱ्यांना किती कर्जमाफी मिळणार* ते पाहूयात...

*कुणाला मिळणार किती कर्जमाफी?*

✅ यापूर्वी कर्जमाफी न मिळालेल्या शेतकऱ्यांचं 2 लाखांपर्यंत संपूर्ण कर्ज माफ होणार.

✅ 2019ला कर्जमाफी मिळालेल्यांचं केवळ 50 हजारांचं कर्ज माफ होणार, उर्वरित रक्कम भरावी लागणार.

✅ 2 लाखांपेक्षा जास्त कर्ज असलेल्यांना 2 लाखांवरील संपूर्ण रक्कम भरल्याशिवाय कर्जमाफी नाही.

✅ नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजारांचं अनुदान मिळणार.

या अटी-शर्तींमुळे अनेक शेतकऱ्यांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. सरकार या नियमांमध्ये बदल करणार का? याकडे राज्यातील लाखो शेतकऱ्यांचं लक्ष लागलं आहे.

*बातमी आवडली असेल तर प्रतिक्रिया द्या:
_आवडली ❤️ | ठीक आहे 👍_
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

Address

Jalna
Jalna
431209

Alerts

Be the first to know and let us send you an email when Aapli Sheti posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category