27/07/2023
नमस्कार,
आज २७ जुलै, आरती गृहउद्योगाला आज ३ वर्ष पूर्ण झाली. आपल्या सर्वांच्या साथीने, आणि आधारामुळे आम्ही ही ३ वर्ष यशस्वीरित्या पूर्ण करू शकलो.
मी सौ. आरती वैभव जोशी. संचालिका, आरती गृह उद्योग - कल्याण.
आरती गृहउद्योग सुरू करण्यामागे दोन कारणे होती.
अनेक वर्ष मी गृहीणीची जबाबदारी पार पाडण्यात मग्न होते. आता दोन्ही मुले मोठी झाली होती. त्यामुळे थोडा वेळ स्वतःसाठी काढता येत होता. हा एक भाग. दूसरं आणि मुख्य कारण म्हणजे गरज. करोंना काळात माझे पती श्री. वैभव जोशी ह्यांचा मूळ व्यवसाय 'पौरोहित्य' पूर्ण पणे बंद झाला.
अशावेळी संसाराची गाडी चालवण्यासाठी रोजगार शोधणे गरजेचे होते. परमेश्वराने दुसरी संधी उपलब्ध करून दिली आणि परमेश्वर कृपेने आरती गृह उद्योगाची सुरवात झाली.
माहेरची मी खान्देशातली. त्यामुळे तिथले पारंपारिक पदार्थ आपसुक माझ्या आई कडून शिकले. गाठीशी असलेली माझी आई व सासुबाईंची शिकवण आणि खान्देशात असलेल्या माहेरच्यांचं पाठबळ गाठीशी घेऊंन नव्या व्यवसायची सुरुवात केली. एक वर्षा पूर्वी मी आणि माझे यजमान आम्ही घरघंटी वर निरनिराळी पिठे, भाजण्या दळून देऊ लागलो. उत्कृष्ट दर्ज्याचा माल वापरून आणि स्वच्छ वातावरणात तयार केल्यामुळे आमच्या पदार्थांना मागणी येऊ लागली. मग हळू हळू लाडू, शंकरपाळे, शेव, चकली ची मागणी सुद्धा होऊ लागली. खान्देशातील वाळवणे जसे, बिबडे, बटाट्याचे पापड, बटाट्याचा कीस, कुरडया, साबुदाणा बटाटा चकली इत्यादी पदार्थांची विक्री सुरू केली.
मिस्टरांची ओळख असल्याने गिऱ्हाईक शोधण्याची गरज कधीच पडली नाही. अनेक मदतीचे हात पुढे आले. श्री. नितीन इतराज ह्यांनी मला ब्राह्मण बिझनेस नेटवर्क ग्लोबल (bbng kalyan) ह्या चॅप्टर मध्ये सामील होण्यास सुचवले. आणि माझ्या ह्या घरघुती कामाला एक व्यावसायिक दर्जा मिळाला. BBNG मधून मला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आणि मी आता खऱ्या अर्थाने उद्योजिका झाले आहे.
ह्या मध्ये मला अनेक लोकांची साथ मिळाली आहे. त्या सर्व लोकांचे मी मनापासून आभार मानते. सर्वांचीच नावे नमूद करणे शक्य नसल्यामुळे, क्षमस्व.
ज्याप्रमाणे आपण गेली तीन वर्ष आरती आणि आरती गृह उद्योग ह्यांना साथ दिली त्याप्रमाणेच आपली साथ आम्हाला मिळत राहील अशी मी आशा करते.
आमच्या बद्दल अजून जाणून घेण्यासाठी, आणि आमच्या वेगवेगळ्या पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी कृपया खाली दिलेल्या भ्रमणध्वनि वर संपर्क साधा.
९८६९६८३६३६ /९९८७११९४००/ ९९८७११९३००