08/09/2024
सर्वांना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा🙏
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
आज मी गणेश पूजना निमित्य मोदकाची अगदी साधी सोपी रेसिपी सांगणार आहे-
मोदक हे सुख, समृद्धी आणि आरोग्याचे प्रतीक आहे. शक्ती आणि बुद्धी ची वाढ करणारा प्रसाद आहे. लहान मुलांना आवर्जून द्यावेत. सर्व लहान मुलांच्या आयांना माझी आग्रहाची विनंती आहे की गणेश उत्सवा साठी पारंपरिक गूळ खोबरे घालून केलेले मोदक प्रसादा साठी करा. चॉकलेट, strawberry, vanilla, butterscotch असे मोदकाचे प्रकार लहान मुलांना निदान या दहा दिवसात तरी देऊ नका.
साहित्य-
सुक्या नारळाचा किस, खसखस आणि गुळ हे सारणासाठी लागणारे मुख्य घटक आहेत. आवडीनुसार व उपलब्धते नुसार इतर सुकामेवा घालू शकता.
नारळ व खसखस मंद आचेवर भाजून घ्या. कोमट असताना च बारीक केलेला गुळ व जायफळ वेलची पूड घालून छान एकत्र करून घ्या. साधारण 1 वाटी नारळ किस, मूठभर खसखस असेल तर 1वाटी गूळ घ्यावा.
मोदकाच्या पाती साठी गव्हाची कणिक घ्यावी. वाटीभर कणिक असेल तर मोठा चमचाभर तेलाचे मोहन व चिमूटभर मीठ टाकून कणिक थोडी घट्ट भिजवून घ्यावी. 15 मिनिटे मुरल्यावर मोदक करावे.
घरी उपलब्ध असलेल्या तेलात तळून घ्यावे. मी घाणीचे शेंगदाण्याचे तेल वापरले आहे.
ही पोस्ट माहितीपर आहे, मोदक विक्रीसाठी उपलब्ध नाहीत याची कृपया नोंद घ्यावी.
आराधना ताठे, नागपूर