01/03/2026
*📢 महत्वाची सूचना – रब्बी हरबरा ई-पीक पाहणी बाबत*
ज्या शेतकऱ्यांची ई-पीक पाहणी (E-Crop Inspection) अद्याप बाकी राहिली आहे, अशा सर्व शेतकऱ्यांनी तात्काळ आपल्या गावातील डीसीएस/तलाठी/संबंधित सहाय्यक यांच्या मदतीने ई-पीक पाहणी पूर्ण करून घ्यावी.
ई-पीक पाहणी ही *शासकीय हमीभाव योजनेचा* लाभ मिळण्यासाठी अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया असून पिकांची नोंद शासनाच्या अधिकृत नोंदीमध्ये करण्यासाठी ही पाहणी आवश्यक आहे. *ई-पीक पाहणी* न झाल्यास *हरबरा हमीभाव* योजनेचा लाभ मिळण्यात अडचणी येऊ शकतात.
*👉 ई-पीक पाहणी करण्यासाठी आवश्यक बाबी:*
• मोबाईल क्रमांक आधारशी लिंक असणे
• 7/12 व 8अ उतारा अद्ययावत असणे
• शेतामध्ये प्रत्यक्ष उभे पीक उपलब्ध असणे
• संबंधित सहाय्यकाशी संपर्क साधणे.
⏰ डीसीएस सहाय्यक स्तरावर ई-पीक पाहणी करण्याची अंतिम *तारीख: 10 मार्च*
म्हणून सर्व शेतकऱ्यांनी शेवटच्या तारखेची वाट न पाहता तात्काळ ई-पीक पाहणी करून घ्यावी.
📌 अधिक माहितीसाठी आपल्या गावातील डीसीएस/तलाठी कार्यालयाशी संपर्क साधावा.
— धन्यवाद