12/12/2025
"हाय डेन्सिटी प्रिसिजन मका लागवड तंत्रज्ञान
६० ते १०० क्विं / एकर उत्पादनाचे आधुनिक तंत्र"
तंत्रज्ञानाबाबत थोडक्यात:
कोरडवाहू शेतीमध्ये हक्काचे उत्पन्न देणारे मका हे महाराष्ट्रातील एक महत्वाचे पीक आहे. जवळपास ४.७५ लाख हे. वर मक्याची लागवड होत असून सरासरी उत्पादकता १७.५ क्विं / एकर एवढी आहे.. त्याचवेळी अमेरिकेची सरासरी उत्पादकता ४५ क्विं / एकर एवढी आहे.
म्हणजेच भारतात मक्याच्या प्रति एकर उत्पादनाच्या वाढीला मोठा वाव आहे.
या अनुषंगाने जगभरात मागील काही वर्षात हाय डेन्सिटी (अतीसघन) लागवड आणि प्रिसिजन इरिगेशन, न्यूट्रिशन आणि प्रोटेक्शन तंत्र (ठिबक द्वारे गरजेनुसार सिंचन,खते आणि पीकसंरक्षके पुरविणे). याद्वारे अमेरिकेत १५८ क्विं / एकर एवढे सर्वोच्च उत्पादन आजतागायत मिळाले आहे. महाराष्ट्रात देखील मागील खरीप हंगामात ५९ क्विं / एकर (मलकापूर शेतकरी उत्पादक कंपनी.) ते ७४ क्विं / एकर (कृषीविज्ञान केंद्र, बारामती) असे उत्पादन मिळाले आहे. काटेकोर नियोजन केल्यास खरिपात ८० क्विं / एकर आणि रबी हंगामात १०० क्विं / एकर उत्पादन मिलउ शकेल असे हे तंत्र आहे.
सदर तंत्र हे डॉ बसवराज गिरेन्नवार Ph.D. Horti, Texas A & M University, USA यांनी विकसित केले असून मागील काही वर्षे बऱ्याच चाचण्या घेतल्यानंतर पीक व्यवस्थापनाचे शेड्युल तयार झाले आहे.
असे आहे तंत्र :
हे जोडओळ लागवड तंत्र आहे ज्यात ४ फुटांवर समांतर ड्रीप लॅटरल पसरवली जाते. पाईपच्या दोन्ही बाजूने २२.५ सेमी वर बी टोकले जाते. प्रत्येक बी १५ सेमी. अंतराने एकापुढे एक असे टोकायचे आहे. अशा रीतीने साधारणपणे 43,560 झाडांची संख्या तयार होते.
तांत्रिक सहाय्य:
पाणी आणि माती परीक्षण: प्रत्येक शेताच्या मातीच्या नमुन्याची आणि पाण्याची चाचणी अहवाल
प्रिसिजन शेड्युल: अहवालानुसार प्रत्येक शेताचे प्रिसिजन शेड्युल तयार करून शेतकऱ्यांना दिले जाते.
रिमोट सेन्सिंग: शेताचे उपग्रहाद्वारे (रिमोट सेन्सिंग) वेळोवेळी निरीक्षण केले जाते आणि गरजेनुसार शेड्युल मध्ये बदल सुचविले जातात.
कृषी सल्ला/ विस्तार सेवा : क्लस्टर मध्ये शेतकरी समूहास कृषीतज्ज्ञांकडून मार्गदर्शन, शेताची पाहणी तसेच फोनवर/ व्हाट्सअप वर देखील मार्गदर्शन केले जाते. तसेच निविष्ठांचा पुरवठा देखील केला जातो
उत्पादनाचे गणित:
एकरी ४३, ५६० झाडांची संख्या प्रति झाड एक कणीस धरता
प्रति कणीस दाणे (ग्राम)
१५० ग्राम
२०० ग्राम
२५० ग्राम
एकरी उत्पादन क्विं
६५ क्विं
८७ क्विं
१०८ क्विं
हंगामानुसार शिफारस असलेले आणि उच्च दर्जाचे संकरित वाण (खरीप आणि रब्बी नुसार) निवड करावी. Syngenta, Advanta, DeHaat कंपनीच्या हायब्रीड्सची किंवा इतर कंपन्यांच्या हायब्रीड्सची देखील निवड करता येईल. आपल्या क्लस्टर नुसार, उपलब्धतेनुसार योग्य हायब्रीड आम्ही सुचवतो त्यानुसार कोणतेही लावू शकता. DeHaat कंपनीचे हायब्रीड लावल्यास कंपनी मक्याची खरेदी १०० रु. प्रति/ टन अधिक दराने खरेदी करेल.
एका क्लस्टर मध्ये शेतकरी वेगवेगळ्या हायब्रीड्स ची लागवड करतच असतात. जे हायब्रीड अधिक चांगले उत्पादन देईल त्याची पुढील हंगामात लागवड करण्यावर भर देता येईल.
शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी उत्तम बिजनेस मॉडेल :
उदा. २०० एकर क्षेत्र लागवड केल्यास निविष्ठांचा (बी, खते, संरक्षके, जैविक) याचा किमान ६० ते ७० लाखांचा इनपुट व्यवसाय करता येईल तसेच मालाच्या खरेदीतून किमान २.४ कोटी ते ३ कोटी इतका आउटपुट व्यवसाय होईल. तसेच मालाच्या पुरवठ्यासाठी पशुखाद्य प्रक्रिया उद्योग, इथेनॉल उद्योग, इतर संस्थात्मक खरेदीदार उदा. देहात यांसोबत खरेदी करारही करता येतील.
या हंगामात आपण आपल्या कार्यक्षेत्रात किमान २० एकर क्षेत्रापासून सुरवात करू शकता. त्यानुसार पुढील खरीप व रबीमध्ये मोठ्या लागवडीचे नियोजन करता येईल.
या प्रकल्पात सामील होण्याचे लाभ ?
आपण आपल्या कृषी उत्पादक संस्था / फेडरेशन्स / CBBOs यांच्या माध्यमातून सामील होऊ शकता.
शेतकरी नोंदणी शुल्क: ९०० रु. / शेतकरी (६०० रु. सूट दिल्यानंतर) - यामध्ये पाणी, माती परीक्षण, प्रिसिजन सल्ला, शेतीतज्ज्ञांचे मार्गदर्शन, भेटी, फोनवर साहाय्य अशा सर्व सेवा दिल्या जातात.
FPC/ फेडेरेशन / CBBOs : शेतकऱ्यांची नोंदणी करणे, माती पाणी नमुना गोळा करून आमच्या प्रतिनिधींकडे देणे अशा साठी १०० रु. सेवा शुल्क प्रत्येक संस्थेला आमच्याकडून देण्यात येते.
रास्त दरात निविष्ठा पुरवठा: गुणवत्ता पूर्ण निविष्ठा थेट शेतकऱ्यांपर्यंत FPC च्या माध्यमातून रास्त दरात पोचविल्या जातात त्यामुळे किमान ६ ते ९ % अधिक बचत होते. आणि FPC चा व्यवसाय ही होतो.
उत्पादन , नफा आणि खर्चाचे गणित खालील तक्त्यात दर्शविल्याप्रमाणे
Photo -
मलकापूर तालुका शेतकरी उत्पादक कंपनी , मलकापूर (बुलडाणा) येथील श्री. प्रशांत तळोले यांचा खरिप २०२५ मधील २ एकर चा प्लॉट. टार्गेट ८० क्विं/ एकर, आलेले उत्पादन ५९ क्विं/ एकर , खर्च रु. ३३,०००/ एकर एकूण(बी, खते, पीक संरक्षण).
सोबत या DrNaresh Shejawal , Vishal RajeBhosale प्रशांत तळोले, भूषण बोरसे
बक्षिसे: सर्वाधिक प्रति एकर उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी रोख रक्कम बक्षिसे.
१ ले बक्षीस - २५ हजार रु. ,
२ रे बक्षीस - १५ हजार रु. ,
३ रे बक्षीस - ५ हजार रु.
१०० क्विंटल / एकर + घेणाऱ्या शेतकऱ्यास ५० हजार रु. रोख बक्षीस !
प्रकल्पात सहभागी होण्यासाठी संपर्क :
डॉ. नरेश शेजवळ : ७७७४०८७०४५ I [email protected]
(सल्लागार महास्ट्राईड (world Bank), महाराष्ट्र ऍग्रीस्टार्टअप्स एफपीओ : MH-Agristartups & FPO community)
नोंदणीसाठी खालील कमेंट मधील लिंक वरील गुगल फॉर्म वर माहिती भरावी
WOTR- Watershed Organisation Trust Baif Campus Warje Pune Reliance Foundation करोडपती एफपीओ Krushak Swaraj Rrfpc Karmala Indian Institute of Remote Sensing, ISRO Model गाँव