आपलं मार्केटयार्ड़..! भाजीपाला, फळे , शेती प्रक्रिया उत्पादने...! आम्ही पोहचवतोय मातीतलं सोनं तुमच्या घरात...!
शेतकरी ते ग्राहक ही संकल्पना आज नविन राहिलेली नाही, किंवा कोरोनाच्या संक्रमण काळामध्ये जिवनावश्यक गोष्टीसाठी घरपोच डीलिवरी मिळवणे हे देखील आज तुम्हा आम्हा साठी नविन राहिलेले नाही...
परंतु याच परिस्थितीचा गैरफायदा घेउन काही व्यापारी वर्गाने शेतकरी ते ग्राहक ही संकल्पना आज नावपुरतीच ठेवली
आहे, सेंद्रीय भाजीच्या नावाखाली विकली जाणारी उत्पादने आज खरच सेंद्रिय असतात का याची शाश्वती ग्राहकाला मिळते का.? विश्वासच प्रतिक असलेल्या शेतकरी वर्गासाठी ही गोष्ट नक्कीच दुखवनारी आहे, सरतेशेवटी चांगली गुणवत्ता देऊनही ती ग्राहकापर्यंत पोहचत नाही.
उत्तम प्रतीचा, योग्य दरामध्ये, ताजा आणि स्वच्छ भाजीपाला आणि शेतमाला वर प्रक्रिया केलेली रोजच्या गरजेची उत्पादने आज ग्राहकापर्यंत घरपोच मिळणे ही सध्याची निकड आहे. आम्ही म्हणू हा आमच्या ग्राहकराजाचा अधिकार आहे. हो, आम्ही अगदी प्रामाणिकपणे सांगतो आम्ही शेती कधी केली नाही, पण शेतकरी कुटुंबाच्या संस्कारच एक गाठोड आम्ही लहानपणापासूनच सोबत ठेवलं आहे, आणि तेच आम्ही घेउन येत आहोत तुमच्या दारात, तुमच्या घरी...अगदी नव्या स्वरुपात...!
शेतातून सकाळी काढलेला भाजीपाला संध्याकाळी तुमच्या घरी आम्ही आणुन देणार..! स्वच्छ,ताजा, कमीत कमी रासायनिक प्रक्रिया केलेला भाजीपाला काळजीपूर्वक पध्दतीने पैकिंग करून आपल्या मागणीनुसार योग्य दरात आम्ही घेउन आलोय. शेतमालावर आधारित प्रक्रिया केलेली नाविन्यपुर्ण उत्पादने देखील आम्ही ग्राहकासाठी उपलब्ध करून देत आहोत. आम्ही बनतोय तुमच्या आणि शेतकरीवर्गामधला दुवा..! उत्तम क्वालीटी ,तत्पर सेवा, योग्य दर याची खात्री आम्ही देतो. तुमच्या सोसाइटी मध्ये आम्ही येउन सर्व गोष्टी घरपोच देण्याची जबाबदारी आमची..!
अधिक माहितीसाठी संपर्क करा. 9145 273 273/ 9145 274 274
आपलं मार्केटयार्ड़ शॉप 05/06 , श्री विठ्ठल हेरिटेज, दत्तनगर, आंबेगाव बु. पणे -411046 See Less