Viva Foods and Beverages

Viva Foods and Beverages Introducing Healthy Snacks . Snacks you can munch anytime of the day without worrying about calories

आ अब लौट चले“आपले पूर्वज आणि आहार” म्हणजे नुसता जेवण नाही, तर जीवनशैली, ऋतू, निसर्ग आणि शहाणपण यांचा संगम होता.आपल्या पू...
09/01/2026

आ अब लौट चले

“आपले पूर्वज आणि आहार” म्हणजे नुसता जेवण नाही, तर जीवनशैली, ऋतू, निसर्ग आणि शहाणपण यांचा संगम होता.

आपल्या पूर्वजांचा आहार कसा होता?

👉स्थानिक व ऋतुनुसार आहार
👉जे पिकेल तेच खाल्ले जात होते
👉उन्हाळ्यात ताक, कोशिंबीर, फळे
👉हिवाळ्यात तिळगूळ, बाजरी, ज्वारी
👉पावसाळ्यात हलका, पचायला सोपा आहार

👉 संपूर्ण धान्यांचा वापर
ज्वारी, बाजरी, नाचणी, वरई,पॉलिश न केलेले तांदूळ, भरड धान्य
आजच्या मैद्यापेक्षा खूपच जास्त फायबर व खनिजे

👍नैसर्गिक शिजवण पद्धती
मातीची भांडी,लोखंडी भांडी,मंद आचेवर शिजवलेले अन्न

👉पूर्णपणे नैसर्गिक आहार
कृत्रिम रंग, चवी, रासायनिक खते नाही

👉 आहारात औषधी तत्त्वे
हळद, आलं, लसूण, जिरे, हिंग,ताक, लोणचं (घरचं),लोणी, तूप
कढीपत्ता, तुळस
अन्न हेच औषध

👉साधा पण संतुलित आहार
भाजी + भाजीचा रस,डाळ/उसळ,पोळी/भाकरी,ताक,चटण्या
रोज वेगवेगळे पण मर्यादित प्रमाणात

👉उपवास आणि अंतर ठेवणे
आठवड्यातून उपवास,सूर्यास्तानंतर हलके जेवण
जेवणात खूप अंतर ,नो फास्ट फूड,पचनसंस्थेला विश्रांती

👉अन्नाबद्दल आदर
अन्न वाया नाही,शांतपणे, बसून जेवण
अन्न हे प्रसाद मानले जात असे

आपल्या परंपरागत आहाराकडे परत वळणे,मिलेट्स, डाळी, भाजी वाढवणे,जंक फूड कमी करणे
ऋतूनुसार खाणे याला पर्याय नाही

अर्चना रायरीकर

*आपल्या शरीराला खूप जास्त कार्बोहायड्रेट ची गरज नसते* *period* . कार्बोहायड्रेटची गरज कोणाला असते तर जी लहान मुलं किंवा ...
31/10/2025

*आपल्या शरीराला खूप जास्त कार्बोहायड्रेट ची गरज नसते* *period* .

कार्बोहायड्रेटची गरज कोणाला असते तर जी लहान मुलं किंवा आजारी माणसं आहेत अशक्त लोक आहेत ,ज्यांचं वजन कमी आहे, जे खूप कष्टाच काम करतात त्यांच्यासाठी ते सगळं ठीक आहे .
ज्यांचे वजन जास्त आहे ,बॉडी मध्ये फॅट्स जास्त आहेत, किंवा ज्यांना प्रि डायबिटीज आहे, डायबिटीज आहे ज्यांना कोलेस्ट्रॉल आहे, ज्यांचा बैठक काम आहे त्यांनी खूप जास्त कार्बोदके खाऊच नाहीत
आणि जे कार्बोदके खावीत ती चांगल्या दर्जाची असली पाहिजेत की ज्याच्यामध्ये तंतुमय पदार्थांचे प्रमाण जास्त हवं.
सदर ताटात नाचणीची भाकरी आहे छोटी
आहारात प्रथिनांचे प्रमाण योग्य असणे हे अत्यंत गरजेचे आहे .त्यामुळे इथे घट्ट डाळ आणि पीठ पेरून सिमला मिरची तसेच जे उपलब्ध आहे ते सॅलड आहे आणि अजून एक रस्सा भाजी देखील आहे .
यामध्ये एक घरगुती लोण्याचा गोळा आहे.
खूप जास्त प्रमाणामध्ये फॅट्सचा बागुल बुवा करण्याची गरज नसते थोडेफार उत्तम दर्जाचे फॅट्स आपल्या आहारात असायला हवे.
लोण्यामध्ये ब्युटरिक ऍसिड असते म्हणून त्याला बटर असे म्हणतात.
ब्युटरिक ऍसिड (Butyric Acid) — मराठीमध्ये याला ब्युटिरिक आम्ल असे म्हणतात.
हे एक शॉर्ट-चेन फॅटी अ‍ॅसिड (SCFA) आहे, जे आपल्या आतड्यातील (gut) चांगल्या बॅक्टेरियांनी तयार केलं जातं विशेषतः जेव्हा आपण फायबरयुक्त आहार खातो.
ते आपल्या पचनासाठी चांगले असते.

💪 याचेशरीरातले फायदे:
*गट हेल्थ सुधारते*
Leaky gut टाळते,सूज (inflammation) कमी करते.
*इम्युनिटी वाढवते*
चांगल्या बॅक्टेरियांची वाढ करून रोगप्रतिकारक शक्ती सुधारते.
*मेटाबॉलिझम सुधारते*
इन्सुलिन सेंसिटिव्हिटी वाढवते, त्यामुळे वजन नियंत्रणात मदत.
*मेंदू आरोग्य (Brain-Gut Axis* ):
न्यूरोइन्फ्लमेशन कमी करून mood आणि focus सुधारते.
*कॅन्सरपासून संरक्षण* :
विशेषतः colon cancer विरोधात उपयोगी असल्याचे काही संशोधन दाखवते.

घरगुती लोणी वापरलेले बरे कारण त्यामध्ये सोडियम असते. बाहेरच्या लोण्यामध्ये बरेचदा मीठ घातलेले असते शिवाय घरगुती ताजे देखील असते .

या आहारामध्ये जर अजून थोडी इम्प्रूमेंट करायचे असेल तर आपण एखादी जवसाची/ तिळाची/ कारळ्याची/ लसणाची चटणी ऍड करू शकतो तसेच एक ग्लास पातळ ताक देखील घेऊ शकतो

आहार आणि केवळ आपला आरोग्यच म्हणत नाही तर आपला आयुष्य बनतं हे ज्याला कळलं त्याचं जीवन सार्थकी लागेल.

अर्चना रायरीकर

08/12/2024

कोई राह में ना थाम जावे
चले चलो चले चलो

Weight training तर चांगलंच!!
त्यात तुम्ही free weights वापरत असाल किंवा तुमचे स्वतःचे शरीराचे वजन वापरत असाल , तर हा एक तुमच्या स्नायूंना बळकट करण्याचा मार्ग आहे......जो तुम्हाला आयुष्यात जलद हालचाली करण्यास सक्षम , तोल राखणे आणि पडणे टाळण्यास मदत करू शकतो.

आपण तोल जाऊन पडलो तर वयानुसार अधिक गंभीर दुखापती होण्याची भीती असते.हिप बोन फ्रेक्चर , मेंदूला दुखापत अश्या मोठ्या आणि गंभीर दुखापती किंवा फक्त काही खरचटणे असे काही होऊ शकते .
65 आणि त्याहून अधिक वयाच्या प्रौढांमध्ये, पडणे हे दुखापतीच्या मृत्यूचे प्रमुख कारण आहे आणि ते टाळायला हवे.

एक साधा व्यायाम आहे जो कोणीही करू शकतो ज्यामुळे पायांचे स्नायू मजबूत होतील आणि वरील घटना टाळण्यास मदत होईल.
ती म्हणजे उलटे चालणे!!!!
ही क्रिया तोल साधण्यास दीर्घकाळ प्रभावी प्रक्रिया आहे, काही लोक हे करताना दिसतात पण त्याच्यामागे त्यांना त्याचे कारण माहिती नसते.

यासाठी थोडी सवय करायला हवी.
सुरक्षित भागात काळजीपूर्वक मागे जा आणि आदर्शपणे लहान टेकडीसारख्या किंचित उतरत्या भागावर जा.
पाठीमागे चालणे करताना स्नायू मजबूत करतात. या स्नायूंना आणि न्यूरोलॉजिकल पॅटर्नला अशा प्रकारे प्रशिक्षण दिल्यास पडणे टाळता येऊ शकते.

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की उलटे चालण्याने गुडघ्याच्या सांध्यावर आणि गुडघ्याच्या कॅप्सवर कमी दबाव येतो. हे गुडघा मजबूत करते, गुडघ्याला आधार देण्यास मदत करते. यामुळे गुडघा ऑस्टियोआर्थरायटिस आणि धावणाऱ्या लोकांच्या गुडघा समस्या यांसारख्या आजारांपासून किंवा दुखापतींपासून गुडघेदुखी कमी होऊ शकते.

थोडक्यात उलट चालणे आपल्या गुडघ्यासाठी चांगले असते, तुला मेंदूला यामुळे चॅलेंज मिळते, तसेच आपला तोल सांभाळायला आणि त्याच सुधारणा होण्यासाठी आपल्याला मदत मिळते.

तुम्ही रोज अर्थात एक तास चालत असाल तर त्यामध्ये पाच मिनिटांसाठी ही ऍक्टिव्हिटी करायला हरकत नाही. अर्थात सुरुवातीला हा नवीन प्रकार असल्यामुळे ते हळूहळू करावी आणि सुरक्षित जागी करावी.

विसू
आपल्या पाठीला डोळे नाहीत त्यामुळे उलट चालायचा सराव करताना कोणावर धडकणार नाही याची मात्र काळजी घ्या

25/11/2024

! ! मधुर फणस ! !
-- डॉ. मंदार नि. दातार

मित्रांनो, साखर आणि गूळ जेव्हा आजच्या इतके प्रचलित नव्हते, तेव्हा गोडपणासाठी फळे हा एक महत्त्वाचा स्रोत होता. वास्को दा गामा इकडे यायच्या आधी आजइतकी फळांची विविधता जरी नसली तरी आपल्या आहारात विविध चवींची अनेक फळे होती. या फळांमध्ये फणसाचे स्थान त्याच्या मधुरपणामुळे फार वरचे होते. फणस हा अस्सल भारतीय असून त्याचा उदय आपल्या सह्याद्रीतच झाला असे मानतात. सर्वमान्य युगाच्या आधीपासूनच फणस आपल्या आहारात महत्त्वाचा भाग होता, याविषयी पुरातन साहित्यात एकमत आहे. फणसाच्या असंख्य पाककृतींचे उल्लेखही या जुन्या ग्रंथामध्ये दिसतात.

एवढेच नव्हे, तर भारतात आलेल्या अनेक प्रवाशांनीही फणसाविषयी लिहिले आहे. सातव्या शतकात भारतात आलेला चिनी प्रवासी ह्युएन-त्सांग, चौदाव्या शतकात आलेला मोरोक्कोचा इब्न बतूता या दोघांनीही भारतातल्या फणसाची चव चाखून त्याविषयी लिहून ठेवले आहे. इब्न बतूताने तर फणसाला भारतातील सर्वांत चवदार फळ मानले आहे.

फणसाला मल्याळममध्ये चक्का असे म्हणतात. या चक्कावरूनच त्याचे पोर्तुगीज नाव जॅक आणि त्यावरूनच इंग्रजीतले नाव जॅक फ्रूट आले आहे. फणसाचे तमिळमधले नाव सिक्कई आहे. सिक्कई म्हणजे साखरेभोवतीचा चोथा. फणसाचे गरे जरी गोड असले तरी भोवतालचा न खाल्ला जाणारा भाग बराच असतो, तोच अर्थ या नावात आला आहे. हिंदीमध्ये त्याला कटहल म्हणतात. कोकणात खाल्ल्या जाणाऱ्या फणसात कापा आणि बरका या दोन महत्त्वाच्या जाती आहेत. चिकट गऱ्यांचा बरका अधिक गोड आणि रसाळ असतो; तर कापा कमी गोड असला तरी कापायला सोपा असतो. फणसाचा खाल्ला जाणारा भाग म्हणजे त्याचे गरे होत. त्याव्यतिरिक्त फणसाच्या फळाच्या आवरणाला चार किंवा चारखंड; मधल्या देठासारख्या भागाला पाव, बीजाला आठळी, छोट्या कच्च्या फणसाला कुयरी असे अनेक खास वेगळे शब्द मराठीत आहेत. फळामध्ये भरपूर चीक असल्याने फणस सोलणे कौशल्याचे काम असते.

फणस बांगलादेश आणि श्रीलंकेचे राष्ट्रीय फळ आहे. लागवडीबरोबरच तो जंगलातही वाढतो. त्यामुळे केवळ आपणच नव्हे, तर दक्षिण भारतातले रानटी हत्ती, गवेही जंगलात वाढणारे फणस आवडीने खातात. फणसाचे शास्त्रीय नाव आर्टोकार्पस आहे. आर्टोकार्पस शब्दाचा अर्थच ब्रेड फ्रूट किंवा भाकरीचे झाड असे आहे. आपल्याकडे जसा फणस आहे तशा आर्टोकार्पसच्या वेगवेगळ्या जाती इंडोनेशिया - मलेशियामध्ये खाल्ल्या जातात.

जाता जाता फणसाविषयी अजून एक गोष्ट. तुम्हाला माहीत आहे का, की फणस हे वृक्षावर येणाऱ्या फळांपैकी सर्वांत मोठे फळ आहे!

18/11/2024

सकस सात्त्विक नाचणी

आपल्या रोजच्या जेवणात ज्वारी, बाजरी अगर कोकणात तांदळाची भाकरी, गव्हाची पोळी, अधूनमधून थालिपीठ, पराटे, धिरडी वगैरे करतात. आपले आदिवासी बांधव मात्र जास्त करून नाचणीची भाकरी खातात. नाचणीची अंबिल करून पितात. कारण ते राहतात तिथे आजूबाजूला नाचणीच पिकवतात. नाचणी अतिशय पौष्टिक धान्य आहे. नाचणीत भरपूर कॅल्शियम असतो. पण ती रुक्ष असल्याने तिच्यात थोडे तांदळाचे पीठ मिसळणे योग्य ठरते. प्रोटिन्स भरपूर असते. नाचणीचे पीठ वापरून पुष्कळ पदार्थ बनवता येतात. असेच काही पदार्थ -

नाचणीची भाकरी ः
साहित्य ः नाचणीचे पीठ, चवीपुरते मीठ, पाणी
कृती ः पिठात मीठ घालून कोमट पाणी घालून पीठ भिजवावे व नाचणीच्या पिठावर मध्यम आकाराची भाकरी थापून तापल्या तव्यावर टाकावी. पाणी लावून नेहमीप्रमाणे भाकरी भाजावी. जर बाकरी थापायला जमत नसेल, तर थोडी कणिक पिठात घालून पीठ भिजवावे आणि हलके पोळी लाटावी व भाकरीप्रमाणे भाजावी.

नाचणीचे रोल ः
साहित्य ः एक वाटी नाचणी 2-3 तास भिजवून 2 चमचे तांदळाचे पीठ. थोडे सोया ग्रॅन्युज, चमचाभर तिखट, मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर, 2 चमचे मोडाचे मूग, 2 चमचे फ्रेंचबीन्स बारीक चिरून, चमचाभर गाजर कीस, 2 चमचे मटार, कढीपत्ता, तिखट, मीठ, तेल, पनीरचा कीस 2 चमचे.
कृती ः नाचणी बारीक वाटावी. त्यात तांदळाचे पीट, सोया ग्रॅन्युज, तिखट, मीठ, कोथिंबीर घालावी. एकत्र करून सरसरीत पीठ बनवावे. कढईत थोडे तेल घालून कढीपत्ता घालावा. त्यात मोडाचे मूग, फ्रेंच बीन्स, गाजराचा कीस, मटार घालून परतावे. तिखट, मीठ घालून परतावे व मसाला तयार करावा. तव्यावर तयार पिठाचा डोसा घालावा. त्यावर मसाला मध्यभागी घालावा. त्यावर थोडा पनीरचा कीस घालावा. घडी घालावी व डोसा डीशमध्ये काढावा. दोन तुकडे करून सर्व्ह करावा.

नाचणीचे बॉल ः
साहित्य ः प्रत्येकी पाव वाटी कणिक व बेसन, एक वाटी नाचणीचे पीठ, दोन मोठे चमचे साजूक तूप, अक्रोडचा चुरा 2 चमचे, पिठी साखर अर्धी वाटी, खजुराचे अगदी बारीक तुकडे पाववाटी, थोडा चॉकलेटचा चुरा, वेलची पूड.

कृती ः साजूक तुपावर सगळी पिठं स्वतंत्रपणे खमंग भाजावीत व नंतर एकत्र करावीत. त्यात अक्रोडचा चुरा, वेलची पूड, पिठी साखर, खजुराचे तुकडे घालून सगळे मिक्‍स करावे व लाडू वळावे व चॉकलेटच्या चुऱ्यात घोळवावे.

नाचणीच्या शेवया ः
साहित्य ः नाचणीचे पीठ एक वाटी, चमचाभर तेल, चवीपुरते मीठ, वेलची पूड, दूध, साखर
कृती ः वाटीभर पाणी उकळत ठेवावे. त्यात तेल, मीठ घालावे. नाचणीचे पीठ घालून हलवावे. झाकण ठेवून वाफ आणावी. वाफ आली की गॅस बंद करून झाकण ठेवावे. म्हणजे सगळे पीठ निघून येईल. जरा वेळाने मळून लांबट गोळा करावा. पातेल्यात पाणी उकळत ठेवावे. उकळल्यावर त्यात पिठाचा गोळा टाकावा. तरंगून वर आल्यावर काढून घ्यावा. मळावा. मग शेवपात्रात घालून शेवया कराव्यात. दूध गरम करावे. त्यात साखर अगर गूळ घालून विरघळून घ्यावा. वेलची पूड घालावी. नारळाचे दूध किंवा साधे दूध घ्यावे. नारळाचे दूध घातल्यास गरम करू नये. फुटण्याची शक्‍यता असते. या दुधाबरोबर नाचणीच्या शेवया द्याव्यात.

नाचणीच्या कुकीज ः
साहित्य ः अर्धी वाटी पिठी साखर, अर्धी वाटी नाचणीचे पीठ, दोन मोठे चमचे तूप, चिमूट सोडा, अर्धा चमचा बेकिंग पावडर, वेलची पूड, बेदाणे, काजू
कृती ः तूप भरपूर फेटावे. त्यात सोडा, बेकिंग पावडर, पिठी साखर, नाचणीचे पीठ, वेलची पूड घालावी. चांगले फेटून मळून घ्यावे. छोटे गोळे करावेत. थोडे चपटे करावेत. काजू, बेदाणे लावावेत. गॅसवर लोखंडी तवा ठेवावा. त्यावर निर्लेप पॅन ठेवावे. त्यात तयार कुकीज ठेवाव्यात. 15 मिनिटे झाकण ठेवून भाजाव्यात. गॅस आवश्‍यकतेप्रमाणे मंद ते मध्यम ठेवावा.

रागीबनाना पुडिंग
साहित्य ः अर्धी वाटी नाचणीचे पीठ, 2 केळी, दोन चमचे साजूक तूप, 4 चमचे गूळ, काजू तुकडे
कृती ः पॅनमध्ये तूप घालावे. केळीचे जरा जाडसर तुकडे करून घालावेत व परतावेत. त्यात बारीक चिरलेला गूळ घालावा व थोडे शिजवावे. नाचणीच्या पिठात पाणी घालून पातळ पेस्ट करावी. ती केळी गुळाच्या मिश्रणात घालावी व शिजवावे. वेलची पूड घालून हलवावे. शिजल्यावर बाऊलमध्ये काढावे. वरून काजू तुकडे लावावेत. थंड झाल्यावर मग सेट करण्याकरता फ्रीजमध्ये पुडिंग ठेवावे.

नाचणीची खीर ः
साहित्य ः नाचणीचे पीठ दोन चमचे, चमचाभर बीट, गाजर अगर लाल भोपळ्याचा कीस, कपभर दूध, वेलची दाणे, दोन चमचे दाण्याचे कूट, दीड चमचा गूळ किसन, खजुराचे 10-12 तुकडे, 8-10 मनुका, 2 चमचे साळीच्या लाह्या, तूप (दूध आवश्‍यकतेप्रमाणे जास्त घालू शकता)
कृती ः थोड्या तुपावर नाचणीचे पीठ परतावे. मग त्यात बीट, गाजर अगर लाल भोपळ्याचा कीस घालून परतावे. एक कप दूध घालावे. वेलची दाणे, दाण्याचे कूट घालून 2 मिनिटे हलवावे. मग गॅस बंद करावा. त्यात किसलेला गूळ, खजुराचे तुकडे, मनुका घालाव्यात. हलवावे. बाऊलमध्ये खीर काढावी. 2 चमचे साळीच्या लाह्या घालून हलके हलवावे.

नाचणीच्या चकल्या ः
साहित्य ः पाऊण वाटी नाचणीचे पीठ, पाव वाटी कणिक, चमचाभर ओवा, 1 चमचा तीळ, चिमूट हिंग, तिखट, मीठ चवीनुसार, पाऊण वाटी पाणी, 2 चमचे तेलाचे मोहन, चिमूट हळद
कृती ः पातेल्यात पाणी उकळत ठेवावे. त्यात मीठ, तिखट, ओवा, तेलाचे मोहन, हिंग, हळद घालावी. पाण्याला उकळी आल्यावर त्यात नाचणीचे पीठ व कणिक घालून हलवावे. 10 मिनिटे झाकून ठेवावे. गॅस बंद करावा. 10-12 मिनिटांनी पीठ सोऱ्यात घालून चकल्या कराव्यात व तापल्या तेलात खमंग तळाव्यात.

नाचणीचे लाडू ः
साहित्य ः एक वाटी नाचणीचे पीठ, एक वाटी कणिक, अर्धी वाटी बेसन, अर्धी वाटी भाजलेल्या सुक्‍या खोबऱ्याचा कीस, अर्धी वाटी तूप, एक वाटी गूळ, तीन चमचे भाजक्‍या तिळाची पूड, चार मोठे चमचे तूप, वेलची पूड, 2 चमचे दूध
कृती ः कढईत चार चमचे तूप घालावे त्यात नाचणीचे पीठ कणिक, बेसन घालून भाजावे. गॅस बंद करावा. 2 चमचे दुधाचा हबका द्यावा. मग पीठ थाळ्यात काढावे. कोमट असतानाच त्यात तीळ पूड, वाटीभर किसलेला गूळ, भाजून चुरगाळलेला सुक्‍या खोबऱ्याचा कीस, वेलची पूड घालावी. चांगले मिसळून घ्यावे. बदाम, पिस्ते, काजूचे काप घालून मिसळावे व लाडू वळावे.

लालमाठ नाचणीचे पराठे ः
वाटीभर पाणी उकळत ठेवावे. त्यात चमचाभर हिरवी मिरची ठेचा, अर्धा चमचा लाल तिखट, मीठ चवीप्रमाणे, चमचाभर आलं - लसूण पेस्ट, चवीपुरती साखर घालावी. उकळी आल्यावर वाटीभर बारीक चिरलेला लाल माठ व बसेल एवढे नाचणीचे पीठ घालावे. शिजवून झाकण ठेवून वाफ आणावी. वाटीभर कणिक, चिमूट मीठ व चमचाभर तेल घालून कणिक भिजवावी. कोमट झालेले सारण मळून ठेवावे. बिझलेल्या कणिकची पारी लाटून थंड झालेल्या सारणाचा गोळा त्यात ठेवून उंडा बनवावा. पिठीवर याचा पराठा लाटावा. तापल्या तव्यावर दोन्ही बाजूला तेल अगर तूप लावून खमंग भाजा. दही - चटणीबरोबर गरमागरम पराठा द्यावा.

नाचणीच्या पिठाचा पराठा
1 वाटी नाचणीच्या पिठात पाव वाटी तांदळाची पिठी अर्धी वाटी बारीक चिरलेली मेथी, तिखट, मीठ, हिंग, हळद घालावी व बारीक चिरलेली मेथी, तिखट, मीठ, हिंग, हळद घालावी व पीठ भिजवून त्याचे छोट्या आकाराचे पराठे लाटावेत व तव्यावर शेकावेत. कडेने थोडे तेल सोडावे. (या पराठ्यात कुठलीही भाजी वापरता येते.)

म्हणून ही नाचणी आपल्या जेवणात वापरणे आरोग्याच्या दृष्टीने योग्य ठरते.

Strawberry, banana, berries with some coconut milk is a great combination for high BP Do not add sugars.Alternative for ...
17/11/2024

Strawberry, banana, berries with some coconut milk is a great combination for high BP

Do not add sugars.

Alternative for coconut milk is soyamilk or almond milk

Do not mix fruit with dairy milk

If berries are not available use dragon fruit

Best time to have is in the morning

Address

Pune
411052

Alerts

Be the first to know and let us send you an email when Viva Foods and Beverages posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Viva Foods and Beverages:

Share