Krushi Utpanna Bazar Samiti Shegaon

Krushi Utpanna Bazar Samiti Shegaon Welcome to The Krushi Utpanna Bazar Samiti Shegaon (Agriculture Produce Market Committee Shegaon) (A

✨ दसरा-दिवाळीची सुवर्ण संधी! ✨🏗️ बांधकाम नियोजित: कृषी उत्पन्न बाजार समिती, शेगाव येथे व्यावसायिक गाळे भाड्याने (लीजवर) ...
26/09/2025

✨ दसरा-दिवाळीची सुवर्ण संधी! ✨

🏗️ बांधकाम नियोजित: कृषी उत्पन्न बाजार समिती, शेगाव येथे व्यावसायिक गाळे भाड्याने (लीजवर) मिळवा!

शेगाव आणि परिसरातील व्यावसायिक बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची सूचना!

सोबतची जाहिरात (प्रगटन) पहा! कृषी उत्पन्न बाजार समिती (APMC), शेगाव (जि. बुलढाणा) येथे 'स्वारस्य अभियोक्ती योजने' (Expression of Interest) अंतर्गत १०२ नवीन, अत्याधुनिक व्यावसायिक गाळ्यांचे बांधकाम नियोजित आहे.

बांधकाम पूर्ण झाल्यावर हे गाळे २९ वर्षांच्या दीर्घ कालावधीसाठी भाडेतत्त्वावर (लीजवर) देण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.

🔥 व्यवसायासाठी सर्वोत्तम जागा! 🔥

मोक्याचे स्थान: हे गाळे थेट कृषी उत्पन्न बाजार समिती, शेगावच्या मुख्य बाजार आवार रोडला लागून असतील.

उच्च वर्दळ: व्यवसायाच्या प्रगतीसाठी आवश्यक उत्कृष्ट दळणवळण आणि जास्तीत जास्त ग्राहकसंख्या (Footfall) येथे मिळेल.

गाळ्यांची संख्या: नियोजित १०२ व्यावसायिक गाळे.

📝 अर्ज करण्याची प्रक्रिया आणि महत्त्वाची मुदत:

इच्छुक व्यावसायिकांनी त्वरित समिती कार्यालयात संपर्क साधावा:

अर्ज वितरण व स्वीकृतीची मुदत: दि. २६/०९/२०२५ ते १०/१०/२०२५ पर्यंत.

मागणी अर्ज शुल्क: रु. ५,०००/- (रोख) भरून अर्ज, नियम व अटींची माहिती मिळवा.

बांधकाम नियोजित असलेल्या या आकर्षक संकुलात आजच आपली जागा आरक्षित करा!

अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा:
📞 9922063434, 8668738381
📍 कृषी उत्पन्न बाजार समिती, शेगाव. जि. बुलढाणा.
दिनांक: 26/09/2025

#व्यावसायिकगाळे #बांधकामनियोजित #लीजकरार #दसरादिवाळी #सुवर्णसंधी

कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना! 📢​तुमच्या कापसाला योग्य भाव मिळवण्यासाठी कपास किसान ॲपवर आजच नोंदणी करा.​न...
18/09/2025

कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना! 📢
​तुमच्या कापसाला योग्य भाव मिळवण्यासाठी कपास किसान ॲपवर आजच नोंदणी करा.
​नोंदणी करण्यासाठी:
​'कपास किसान' ॲप डाउनलोड करा.
​जमिनीच्या नोंदी, पीक लागवडीची नोंद, आधार कार्ड आणि फोटो ही कागदपत्रे तयार ठेवा.
​नोंदणीची अंतिम तारीख: 30 सप्टेंबर 2025.
​या सुवर्ण संधीचा लाभ घ्या! अधिक माहितीसाठी ॲपला भेट द्या.
​ #शेतकरी #कापूस #कापूसउत्पादक #कृषी #शेतकरीमित्र #महाराष्ट्र #शेतकरीयोजना

शेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती, बुलढाणा जिल्ह्यासाठी एक अभिमानास्पद क्षण!‍दिनांक 16 सप्टेंबर 2025 रोजी शेगाव कृषी उत्पन्...
17/09/2025

शेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती, बुलढाणा जिल्ह्यासाठी एक अभिमानास्पद क्षण!
‍दिनांक 16 सप्टेंबर 2025 रोजी शेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीला अमरावती विभागातून आदर्श बाजार समिती म्हणून ३ रा क्रमांक मिळाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन!
​महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ, पुणे यांच्यामार्फत हे गौरवशाली पारितोषिक स्वीकारताना, सहकार नेते मा. पांडुरंगदादा पाटील, सभापती गोपाळराव मिरगे, आणि सचिव विलास पुंडकर उपस्थित होते.
​या यशाचे खरे मानकरी असलेले सर्व शेतकरी, व्यापारी, हमाल, मापाडी आणि इतर सर्व घटकांचे मनःपूर्वक अभिनंदन! आपल्या सर्वांच्या योगदानातूनच हे यश शक्य झाले आहे. 🙏🏻 #शेगाव
#कृषीउत्पन्नबाजारसमिती
#बुलढाणा
#आदर्शबाजारसमिती
#कृषी
#महाराष्ट्र

*माटरगाव बुद्रुक येथे अत्याधुनिक १००० मे.टन गोदाम बांधकामाचा लोकार्पण सोहळा व नवीन धान्य बाजाराचा शुभारंभ..*शेगाव – दिना...
31/08/2025

*माटरगाव बुद्रुक येथे अत्याधुनिक १००० मे.टन गोदाम बांधकामाचा लोकार्पण सोहळा व नवीन धान्य बाजाराचा शुभारंभ..*

शेगाव – दिनांक 29 ऑगस्ट 2025 रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती शेगाव अंतर्गत माटरगाव बुद्रुक उपबाजार येथे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, पुणे व कृषी उत्पन्न बाजार समिती, शेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक १००० मेट्रिक टन क्षमतेच्या गोदाम बांधकामाचा लोकार्पण सोहळा व नवीन धान्य बाजाराचा शुभारंभ सहकार नेते पांडुरंगदादा पाटील यांचे हस्ते उत्साहात पार पडला.

या लोकार्पण सोहळ्यास अध्यक्षस्थानी माटरगाव येथील प्रतिष्ठित नागरिक अनंतराव आळशी हे होते. प्रमुख अतिथी म्हणून माऊली ग्रुपचे चेअरमन ज्ञानेश्वरदादा पाटील, दिनेश एम.डागा, उपसरव्यवस्थापक महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ विभागीय कार्यालय, अमरावती, एम.जी. काकडे, जिल्हा पणन अधिकारी बुलढाणा, जिल्हा परिषद माजी सभापती सुरेशभाऊ वनारे, भीमरावजी राऊत, शेगांव खरेदी-विक्री संघाचे माजी अध्यक्ष रघुनाथ भांबेरे, जिल्हा परिषद सदस्य राजूभाऊ देवचे, माटरगाव चे सरपंच इनायतभाई, ग्रामसेवा सोसायटी माटरगावचे अध्यक्ष राजेश बाजारे, पंचायत समितीचे सदस्य विठ्ठल सोनटक्के, शेतकरी नेते कैलासभाऊ फाटे, बाजार समितीचे माजी सभापती गजाननराव भटकर, उपसभापती सुनील वानखडे, देवलाल पाटील लांजुळकर, माजी पोलीस पाटील दिलीप देशमुख, गजाननराव देशमुख, निवृत्तीभाऊ खवले, निंबाळकर साहेब, गजानन निखाडे, महादेवराव देठे, दिंडोकार साहेब यांचे सह कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गोपाळराव मिरगे उपसभापती श्रीकांत तायडे संचालक विठ्ठलदादा पाटील,श्रीधरदादा पाटील, रमेश पाटील, दादाराव निळे, योगेश थारकर, परमेश्वर हिंगणे, अमोल लांजुळकर, संजय गव्हांदे, गुलाब खा, रितेश टेकडीवाल, श्रीधर पुंडकर, वासुदेवराव धुमाळे, तेजराव दळी, अरुण पाटील खोंड, संजय शेळके, संतोष भारसाकडे, शेगांव खरेदी-विक्री संघाचे उपाध्यक्ष अनंतराव बोरसे, संचालक नारायण नावकार, आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
शेतकरी बांधवांसाठी आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या हेतूने राबविण्यात येत असलेल्या या प्रकल्पाचे अनेकांनी कौतुक केले. धान्य बाजाराच्या शुभारंभामुळे शेतकऱ्यांना विक्रीसाठी सुलभता मिळणार असून, गोदामाच्या माध्यमातून त्यांच्या कृषी उत्पादनाची सुरक्षित साठवणुकीची सोय निर्माण झाली आहे. त्यामुळे परिसरातील शेतकरी बांधवांनी आपला शेतीमाल सदर धान्य बाजारात विक्रीला आणावा असे आवाहन यावेळी सहकार नेते पांडुरंगदादा पाटील यांनी केले. पणन मंडळाच्या योजना, व बाजार समिती करीत असलेले उत्कृष्ट कामकाज यावर भर देऊन पणन मंडळामार्फत व बाजार समिती मार्फत उभारण्यात आलेल्या या अत्याधुनिक गोदामाचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन दिनेश एम डागा उपसरव्यवस्थापक कृषी पणन मंडळ अमरावती यांनी केले. तर ज्ञानेश्वरदादा पाटील यांनी आपले भाषणामधून शेतमाल तारण योजना, शासनाचे किमान आधारभूत योजनेअंतर्गत उपबाजार येथील नाफेड खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी शेतीमाल विक्री करणे बाबत उपस्थित शेतकरी बांधवांना आवाहन करून शेतकरी हितासाठी बाजार समितीचे संचालक मंडळ सदैव कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन व्यक्त केले.
कृषी पणन मंडळ पुणे व बाजार समिती शेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने उभारलेले हे अत्याधुनिक गोदाम ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना मोठा आधार ठरणार आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या कृषी मालाला योग्य भाव मिळण्यास मदत होईल, तसेच बाजार समितीच्या व्यवहारात पारदर्शकता व गती येणार असल्याचे कार्यक्रमाचे अध्यक्ष अनंतराव आळशी यांनी आपल्या भाषणातून सांगितले.
या कार्यक्रमाप्रसंगी पांडुरंगदादा पाटील यांना लोकमत गौरव पुरस्कार मिळाल्याबाबत त्यांचा सत्कार शाल, पुष्पगुच्छ व श्रीफळ देऊन माटरगाव ग्रामपंचायत व विविध कार्यकारी सहकारी संस्थेमार्फत करण्यात आला. तसेच शेगाव तालुका खरेदी विक्री संघाला राज्यातून प्रथम क्रमांक प्राप्त झाल्यामुळे खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष श्रीधरदादा पाटील यांचे सह उपस्थित संचालक मंडळाचा सत्कार सुद्धा मान्यवरांच्या हस्ते शाल,श्रीफळ देऊन करण्यात आला. तसेच नव्याने सुरू झालेल्या धान्य बाजारात आपला शेतीमाल विक्रीला आणणारे शेतकरी बांधवांचा सत्कार सुद्धा शेला, हार,टोपी व नारळ देऊन बाजार समितीच्या वतीने करण्यात आला.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव विलास पुंडकर यांनी केले तर सूत्रसंचालन मनिष देशमुख यांनी केले तर आभार प्रदर्शन समितीचे सभापती गोपाळराव मिरगे यांनी केले. या कार्यक्रमास बाजार समितीचे कर्मचारी, व्यापारी, परिसरातील ग्रामसेवा सोसायटीचे अध्यक्ष, सदस्य, ग्रामपंचायतचे सरपंच, सदस्य, व शेतकरी बांधव यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. #धान्यबाजार


#धान्यगोदाम

🙏🌺 कृषी उत्पन्न बाजार समिती, शेगाव येथे गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात 🌺🙏आज कृषी उत्पन्न बाजार समिती, शेगाव येथे विधीवत पूज...
27/08/2025

🙏🌺 कृषी उत्पन्न बाजार समिती, शेगाव येथे गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात 🌺🙏

आज कृषी उत्पन्न बाजार समिती, शेगाव येथे विधीवत पूजन करून श्री गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली.
सर्व अधिकारी, कर्मचारी व मान्यवरांच्या उपस्थितीत हा मंगल सोहळा उत्साहात संपन्न झाला.

🌿 गणपती बाप्पा मोरया! मंगलमुर्ती मोरया!! 🌿

✨ या पवित्र पर्वामुळे सर्व शेतकरी बांधव, व्यापारी व नागरिकांच्या जीवनात सुख, शांती व समृद्धी नांदो हीच श्रींच्या चरणी प्रार्थना. 🙏

🌸🌾

कृषी उत्पन्न बाजार समिती, शेगाव                🌱
27/08/2025

कृषी उत्पन्न बाजार समिती, शेगाव

🌱

07/08/2025

आमचे प्रेरणास्थान स्व. गजाननदादा पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त ​त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन!..

कृषी उत्पन्न बाजार समिती, शेगाव येथे दिनांक 06-08-2025 स्व. गजाननदादा पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त भावपूर्ण श्रद्धांजल...
07/08/2025

कृषी उत्पन्न बाजार समिती, शेगाव येथे दिनांक 06-08-2025 स्व. गजाननदादा पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या वेळी संचालक आणि कर्मचाऱ्यांनी दादांच्या कार्याला आदराने स्मरण केले.
​त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन!

Address

Main Road
Shegaon
444203

Opening Hours

Monday 9:45am - 6pm
Tuesday 9:45am - 6pm
Wednesday 9:45am - 6pm
Thursday 9:45am - 6pm
Friday 9:45am - 6pm
Saturday 9:45am - 6pm

Telephone

+917265252014

Alerts

Be the first to know and let us send you an email when Krushi Utpanna Bazar Samiti Shegaon posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Krushi Utpanna Bazar Samiti Shegaon:

Share

Category