Dr. Veggies

Dr. Veggies Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Dr. Veggies, Fruit & vegetable shop, .

11/10/2025

शिर्डी येथे रा. स्व. संघाचे शताब्दी पथसंचलन

शिर्डी, दिनांक १० ऑक्टोबर २०२५ ः राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दीनिमित्त शिर्डी येथे भव्य पथसंचलन आयोजित करण्यात आले होते. शुक्रवारी (१० ऑक्टोबर) पार पडलेल्या या पथसंचलनाचे स्वयंसेवकांबरोबरच ग्रामस्थांनीही उत्साहात स्वागत केले. गेली ५० वर्षांहून अधिक काळ विजयादशमी पथसंचलनाची शिर्डीतील परंपरा कायम आहे.

शताब्दी वर्षामुळे शिर्डी शहरातील सर्व स्वयंसेवकांमध्ये आणि समाजात देखील उत्साहाचे वातावरण होते. शुक्रवारी सायं. ०५:०० वा. पथसंचलन श्रीरामनगर भागातून सुरू होऊन छत्रपती शिवाजी महाराज चौक, श्री साईबाबा मंदिर परिसर येथून सिल्वर ओक लॉन्स या मुख्य कार्यक्रमस्थळी पोहोचले. यावेळी संपूर्ण मार्गामध्ये शिर्डी शहरातील माता-भगिनी, नागरिक, हिंदुत्ववादी कार्यकर्ते तसेच विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी संचलनावर मोठ्या प्रमाणात पुष्पवृष्टी करून तसेच सडा-रांगोळी काढून स्वागत केले.

मुख्य कार्यक्रमस्थळी विजयादशमी उत्सवाचे प्रमुख अतिथी श्री. प्रतापराव जगताप, प्रमुख वक्ते श्री. विनयजी पत्राळे, माननीय जिल्हा संघचालक श्री. किशोरजी निर्मळ, माननीय तालुका संघचालक श्री. रावसाहेब काका गोंदकर यांच्या शुभहस्ते शस्त्रपूजन करण्यात आले. यावेळी संघाविषयी आपल्या सद्भावना प्रकट करताना प्रमुख अतिथी श्री. प्रतापराव यांनी शताब्दीची वाटचाल करत असताना उपस्थित बाल, तरुण आणि प्रौढ स्वयंसेवकांना उल्लेखून, संघाची साधना, उपासना आणि उपलब्धी म्हणजे हे तीन वयोगट आहेत असे आपले मनोगत व्यक्त केले. यानंतर प्रमुख वक्ते श्री. विनयजी पत्राळे यांनी संघाच्या शताब्दीनिमित्त पूजनीय सरसंघचालकांनी सर्व स्वयंसेवक तसेच संपूर्ण समाजाला आव्हान केलेल्या 'पंच परिवर्तन बिंदूं'चे विश्लेषण केले. यात सामाजिक समरसता, पर्यावरण संरक्षण, कुटुंब प्रबोधन, स्व बोध आणि नागरिक कर्तव्य या मूल्यांचा आपल्या जीवनात अंगीकार केल्यास आपला भारत देश हा जगाच्या केंद्रस्थानी राहील. यातूनच विश्व शांती आणि विश्व कल्याणाचा मार्ग प्रशस्त होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या संपूर्ण कार्यक्रमात शिर्डी उपखंडातून ६८७ तरुण, ५० बाल स्वयंसेवक तसेच समाजातील ६५ माता-भगिनी आणि ११५ बांधव उपस्थित होते.

Address


423109

Opening Hours

Monday 09:00 - 22:00
Tuesday 09:00 - 22:00
Wednesday 09:00 - 22:00
Thursday 09:00 - 22:00
Friday 09:00 - 22:00
Saturday 09:00 - 22:00
Sunday 09:00 - 22:00

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr. Veggies posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

  • Want your business to be the top-listed Grocery Store?

Share