U S Farm

U S Farm farmer producer

19/08/2025

*राज्यात पोळ्यापर्यंत 'या' भागात पुन्हा अतिवृष्टीची इशारा*

*🌾डिजिटल शेतकरी🌾*

राज्याच्या विविध भागात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला असून जवळपास चार लाख हेक्टर क्षेत्रातील पिके बाधित झाली आहेत.
राज्याच्या विविध भागात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला असून जवळपास चार लाख हेक्टर क्षेत्रातील पिके बाधित झाली आहेत.
पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज्यात २१ ऑगस्टपर्यंत पुन्हा अतिवृष्टीची शक्यता वर्तविण्यात आली असून १७ ते १६ जिल्ह्यात रेड अलर्ट तर काही जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी मंत्रालयातील राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षात पावसाच्या स्थितीचा आढावा घेतला.
विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांशी ऑनलाइन संपर्क साधला, यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री गिरीश महाजन उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी पत्रकारांना अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती दिली.
नांदेड विभागात २०६ मिमी इतका ढगफुटीसदृश पाऊस झाला असून तिथे एनडीआरएफ, एसडीआरएफसह आता सैन्यदलाला देखील पाचारण केले आहे. मुंबईत सोमवारी सकाळी ६ नंतरच्या सहा तासात १७० मिमी पाऊस झाला.
मुंबईत मंगळवारी चार मीटरपर्यंतच्या लाटा उसळणार आहेत. ज्या भागात रेड अलर्ट आहे, तेथील नागरिकांनी आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन फडणवीस यांनी केले.

*१९ ऑगस्टला कुठे काय?*
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे, सातारा, कोल्हापूर घाट भागात मंगळवारी रेड अलर्ट देण्यात आला आहे. पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, अमरावती, चंद्रपूर आणि गडचिरोली या भागात अंरिंज अलर्ट देण्यात आला आहे.

*नुकसान भरपाईचे संपूर्ण अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना*
घरांचे नुकसान, माणसे, पशुधनाचे मृत्यू याबाबत झालेल्या नुकसानीच्या भरपाईचे अधिकार हे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. त्यासाठीचा निधीही उपलब्ध करून देण्यात आला आहे. घरांचे नुकसान झालेल्यांना तात्पुरते निवारे उभारण्याचे, तसेच तेथील लोकांना जेवण आणि पिण्याचे स्वच्छ पाणी पुरविण्याचे आदेश देण्यात आल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

19/08/2025

*शेतकरी योजनांचा फायदा आता सर्व शेतकऱ्यांना मिळणार; लाभार्थी निवडीसाठी नवीन धोरण लागू*

*🌾डिजिटल शेतकरी🌾*

विविध कृषी योजना यापूर्वी लकी ड्रॉ पद्धतीने देण्यात येत होत्या. मात्र, आता या पद्धतीला पूर्णपणे बंद करून नवीन धोरण लागू करण्यात आले आहे.
यानुसार, प्रथम अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यालाच या योजनांचा फायदा मिळणार आहे. या बदलामुळे शेतकऱ्यांसाठी अधिक पारदर्शकता आणि सोय निर्माण होईल.
तसेच, यामुळे शेतकऱ्यांना योजना मिळवण्यासाठी अनावश्यक वेळ वाया जाण्याची गरज राहणार नाही. शेतकऱ्यांसाठी राज्य व केंद्र शासनाने अनेक महत्त्वाच्या योजना सुरू केल्या आहेत.
यात पीक विमा योजना, सिंचन सुधारणा योजना, शेतीसंबंधित अनुदान, शेतकरी कर्ज सुविधा आणि आधुनिक शेती साधने मिळवण्यासाठीची योजना यांचा समावेश आहे.

या योजनांचा उद्देश शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे, पिकांचे नुकसान कमी करणे, शेतीसाठी आधुनिक साधने उपलब्ध करून देणे आणि आर्थिक स्थैर्य निर्माण करणे हा आहे.
योग्य योजनांचा लाभ घेऊन शेतकरी त्यांच्या शेतीत सुधारणा करू शकतात आणि उत्पन्नात वाढ साधू शकतात. यापूर्वी या योजनांचा लाभ मिळवण्यासाठी लकी ड्रॉ पद्धत वापरली जात असे.
शेतकऱ्यांनी अर्ज केला आणि नशीब असल्यासच त्याला योजना मिळायची. या पद्धतीत अनेक शेतकऱ्यांचा अर्ज नसेल तरही त्यांना लाभ मिळत नव्हता.
अनेक शेतकऱ्यांना वर्षानुवर्षे वाट पाहावी लागली, तरीही त्यांचा अर्ज डोळ्यासमोर येत नव्हता. त्यामुळे अनेकांना नाराजी आणि तक्रारी होण्याचे प्रसंग घडले.

*प्रथम येईल त्याला प्राधान्याचे धोरण*
नवीन धोरणानुसार, जो शेतकरी प्रथम अर्ज करेल, त्यालाच प्राधान्य दिले जाईल. यामुळे लकी ड्रॉवर अवलंबून न राहता, अर्ज लवकर करणाऱ्या शेतकऱ्यांना लगेच योजना मिळू शकतात. या नव्या पद्धतीमुळे योजना मिळवण्याची प्रक्रिया पारदर्शक, जलद आणि सुलभ होणार आहे.

*अवघ्या ३५ ते ५० टक्के शेतकऱ्यांनाच प्रत्यक्ष लाभ*
लकी ड्रॉ पद्धतीमुळे फक्त ३५ ते ५० टक्के शेतकऱ्यांनाच प्रत्यक्ष फायदा मिळत असे. उर्वरित शेतकऱ्यांना योजना मिळवणे शक्य होत नसे. त्यामुळे अनेक शेतकरी अनुदान किंवा लाभ घेण्यासाठी अनेकदा अपयशी ठरत होते. या पद्धतीमुळे वेळ, श्रम वाया जात असे.

*लाभासाठी पुन्हा-पुन्हा काढावी लागायची सोडत*
पूर्वी शेतकऱ्यांना योजना मिळवण्यासाठी अनेकदा अर्ज पुन्हा-पुन्हा करावे लागायचे. यामुळे त्यांना वेळखाऊ आणि थकवणारा अनुभव येत असे. अनेक वेळा अर्ज करूनही काही परिणाम होत नसल्यामुळे शेतकरी निराश होत असे. या समस्येमुळे योजना मिळविण्यात अडचणी येत होत्या.

*लाभासाठी महाडीबीटी पोर्टलवर करा अर्ज*
शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करून नव्या धोरणाचा लाभ घेणे आवश्यक आहे. अर्ज करताना आपली माहिती, जमीन व पीक तपशील अचूक भरावे. योग्य माहिती भरल्यास योजना सहजपणे मिळू शकते. पोर्टलवर अर्ज केल्याने, शेतकरी त्याचा लाभ वेळेत आणि सुरक्षित पद्धतीने घेऊ शकतात.

*नव्या धोरणाचा असा होणार फायदा*
या नव्या धोरणामुळे शेतकऱ्यांचा वेळ वाचेल आणि अर्ज प्रक्रियेत ताण कमी होईल. शेतकऱ्यांना त्यांच्या मेहनतीचे योग्य फळ मिळेल आणि योजना अधिक परिणामकारक ठरतील. तसेच, कोणावरही अन्याय होणार नाही आणि योजना न्याय पद्धतीने वाटल्या जातील. या बदलामुळे शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि ते योजनांचा अधिक फायदा घेऊ शकतील.

19/08/2025

*मे महिन्यातील पीक नुकसानीचे ४० कोटी आले; लवकरच बँक खात्यावर जमा होणार*

*🌾डिजिटल शेतकरी🌾*

मे महिन्यातील पूर्व मोसमी पावसाने झालेल्या २२ हजार हेक्टर क्षेत्रातील पीक नुकसानीचे ४० कोटी ४४ लाख रुपये शासनाकडून आले.
आता ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाणार आहे. करमाळा व माढा तालुक्यातील शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते.
यंदा मे महिन्यात जिल्हात एकूण २३३ मि.मी. इतका पाऊस पडल्याने जिल्ह्यातील शेती पिकांचे नुकसान झाले होते. त्याचे पंचनामे करण्यात आले होते.

जिल्ह्यात २१ हजार ९८९ शेतकऱ्यांच्या ३२ हजार ४४० हेक्टर पिकांचे नुकसान झाले होते. त्याची नुकसान रक्कम ४० कोटी ४३ लाख ४६ हजार रुपये शासनाकडे मागणी केली होती
ही रक्कम आली शासनाकडून असून, जिल्हाधिकारी कार्यालयाने तहसील कार्यालयाला वितरीत करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.

*कोणत्या तालुक्याला किती?*
मंगळवेढा तालुक्यात ४३ शेतकऱ्यांची पाच लाख
अक्कलकोट तालुक्यात १४८ शेतकऱ्यांचे १७ लाख
सांगोला तालुक्याची १०२ शेतकऱ्यांची १८ लाख
पंढरपूर तालुक्यात ५७४ शेतकऱ्यांचे ६५ लाख
दक्षिण सोलापूर तालुक्यात ६७५ शेतकऱ्यांचे ९३ लाख
उत्तर तालुक्यात २१८९ शेतकऱ्यांचे एक कोटी ७६ लाख
मोहोळ तालुक्यात १४३१ शेतकऱ्यांचे एक कोटी ७९ लाख
बार्शी तालुक्यात पाच हजार १३८ शेतकऱ्यांचे तीन कोटी १७ लाख
माळशिरस तालुक्यात तीन हजार १७३ शेतकऱ्यांचे तीन कोटी ४२ लाख
माढा तालुक्यात दहा हजार १४७ शेतकऱ्यांचे १३ कोटी ७८ लाख
करमाळा तालुक्यात आठ हजार ८३० शेतकऱ्यांची १४ कोटी ५५ लाख रुपये शासनाकडून आले आहेत.

*केळीचे झाले होते अधिक नुकसान*
◼️ जिरायत क्षेत्रातील ३५६१ शेतकऱ्यांच्या १५७० हेक्टर क्षेत्रासाठी एक कोटी ३३ लाख ४२ हजार रुपये, बागायती क्षेत्रातील १९ हजार २७१ शेतकऱ्यांच्या १२ हजार ४४२ हेक्टर क्षेत्रासाठी २१ कोटी १५ लाख, तर फळबागा बाधित ९ हजार ६०८ शेतकऱ्यांच्या ७ हजार ९७७ हेक्टरसाठी १७ कोटी २५ लाख रुपये, याप्रमाणे पीक नुकसानभरपाईसाठी शासनाकडे निधी मागणी केला आहे.
◼️ केळी ५२५३ हेक्टर, मका १६९६ हे., भाजीपाला १४७० हे., डाळिंब ११७० हेक्टर, भुईमूग ७०२ हे., आंबा ४८० हे., पपई ४५१ हे. आदी नुकसान क्षेत्र.

19/08/2025

*राज्यात पावसानं शेतीपिकांची दाणादाण, शेतकऱ्यांनो पहिल्यांदा 'हे' काम करा!*

*🌾डिजिटल शेतकरी🌾*

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मराठवाड्यातील (Marathwada Rain) बहुतांश भागासह राज्यातील काही भागात पावसाने धुमाकूळ घातला आहे. ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने अनेक भागांमध्ये शेती पिकांचे अतोनात नुकसानही झाले आहे. अशा पद्धतीने नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.
हंगाम २०२५ मध्ये मान्सूनचा लहरीपणा मोठ्या प्रमाणात दिसून येऊ लागला आहे. याची प्रचिती गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या मराठवाड्यातील पावसाने दाखवून दिले आहे. ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेती पिकांना मोठा फटका बसला आहे.
जर आपल्याही शेती पिकांचं नुकसान झालं असेल तर तात्काळ आपल्या कृषी सहाय्यक तलाठी यांच्याशी संपर्क साधून आपल्या होत असलेल्या झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून घेण्याचा प्रयत्न करावा. खरीप हंगाम २०२५ मध्ये जो पिक विमा दिला जाणार आहे, तो पीक कापणीच्या अंतिम अहवालाच्या आधारे दिला जाणार आहे.

*तरच नुकसान भरपाई*
ज्या महसूल मंडळामध्ये ज्या गावांमध्ये अशा प्रकारे पावसाने नुकसान होते आहे. त्या ठिकाणी पंचनामे केले जातात. नुकसानीची जी काही आकडेवारी समोर येईल. त्यामध्ये जर गाव बाधित दिसून आले, तर पुढे की पीक कापणीच्या वेळी याचा फायदा शेतकऱ्यांना होऊ शकतो. शिवाय शासनाच्या माध्यमातून अतिवृष्टी किंवा पूर परिस्थितीमुळे झालेली नुकसान भरपाई देण्यात येऊ शकते. त्यासाठी सद्यस्थितीतला पंचनामा करणे गरजेचे आहे.

*पंचनामे करून घ्या*
त्यामुळे या पावसामुळे ज्या काही शेतकऱ्यांचा नुकसान झालं आहे. अशा शेतकऱ्यांनी तात्काळ शासनाच्या कुठल्या आदेशाची वाट न पाहता आपल्या तलाठी किंवा कृषी सहाय्यकाकडून पंचनाम्यासाठी पाठपुरावा करायला सुरुवात करा. जेणेकरून पंचनामा केल्यानंतर जेव्हा नुकसान भरपाईचा आदेश येईल तेव्हा पंचनामे झालेल्या शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात येई

19/08/2025

*२० गुंठे क्षेत्रात मुंढे दाम्पत्याने घेतले टोमॅटो पिकातून १.५० लाखांचे उत्पन्न*

*🌾डिजिटल शेतकरी🌾*

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या धारला (ता. सिल्लोड) येथील प्रयोगशील शेतकरी बालाजी मुंढे व त्यांच्या पत्नी कालिंदा मुंढे यांनी अवघ्या २० गुंठे क्षेत्रात टोमॅटोची लागवड करून तब्बल १.५० लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड देत, या दाम्पत्याने मेहनतीच्या जोरावर यशाचे शिखर गाठले आहे.
शेतकरी बालाजी मुंढे यांनी आपल्या वडिलोपार्जित ५ एकर शेतजमिनीतील २० गुंठे क्षेत्रावर सेंद्रिय खत व ड्रिप सिंचनाचा वापर करून टोमॅटोची लागवड केली. मिश्र खताचा डोस वापरून जमीन तयार केल्यानंतर त्यांनी सुमारे ३ हजार टोमॅटो रोपे विकत आणून लागवड केली.
पिकावर करपा, बुरशी, नागअळी आदी रोगांचे नियंत्रण ठेवण्यासाठी प्रत्येक आठवड्याला फवारण्या करून पिकाची निगा राखली. या पिकासाठी त्यांनी आतापर्यंत ३० ते ३५ हजार रुपयांचा खर्च केला असून, आजपर्यंत ८० ते ९० हजार रुपयांचे उत्पन्न त्यांना टोमॅटो विक्रीतून मिळाले आहे. पुढील काही दिवसांत अजून ५० ते ६० हजार रुपयांचे उत्पन्न अपेक्षित असल्याचे मुंढे यांनी सांगितले.

आम्ही भेंडी, कोथिंबीर, हंगामी मिरची, वाल, टोमॅटो यांसारखी नगदी व पालेभाज्यांची लागवड करीत आहोत. शेतकऱ्यांनी वर्षातून एकच पीक न घेता, नगदी पिकांचे नियोजन करून वर्षात ३-४ पिके घेणे शक्य आहे. - बालाजी मुंढे, शेतकरी.

*स्थानिक बाजारपेठेत विक्री*
मुंढे यांनी सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर, कन्नड, चिंचोली, भराडी व इतर स्थानिक बाजारपेठांमध्ये टोमॅटोची विक्री केली. सुरुवातीला दर २००० रुपये प्रति कॅरेट होता; परंतु, मागणीत वाढ झाल्याने सध्या २५०० रुपये प्रति कॅरेट दर मिळत असल्याचे ते सांगतात.

Address

Umbraj
415109

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when U S Farm posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category